वसई येथील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि डॉ. म. ग. परुळकेर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १८ फेब्रुवारी रोजी ‘आकाश विज्ञान’ या विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत हे व्याख्यान परुळकेर शाळेचे सभागृह, भास्कर आळी, वसई येथे होणार आहे.  
कार्यक्रम विनामूल्य असून लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी विद्यार्थी महासंघाचे सचिव चिन्मय गवाणकर यांनी केले आहे. या कार्यक्रमानंतर याच ठिकाणी रात्री आडेआठ ते अकरा या वेळेत सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली टेलिस्कोपमधून प्रत्यक्ष आकाश दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित असून इच्छुकांनी नावनोंदणी अभ्यंकर आणि मंडळी यांचे पुस्तकांचे दुकान, पारनाका, वसई येथे येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. अधिक माहितीसाठी प्रा. महेश अभ्यंकर-९८९००७६१३८/कौस्तुभ राऊत-९५९४०९४०४१ यांच्याशी संपर्क साधावा.

.