शालेय विद्यार्थ्यांमध्ये मनोरंजकरीत्या विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांनी स्वत: वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती करण्यास पुढाकार घ्यावा या उद्देशाने काही वर्षांपासून शहरात लोकप्रिय झालेल्या ‘संडे सायन्स स्कूल’ चे वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत.
इतर शाळांप्रमाणे ही शाळा नसून संडे सायन्स स्कूल म्हणजे दर रविवारी भरणारी विज्ञानाची कार्यशाळा होय. या शाळेत विद्यार्थी विज्ञान विषयातील विविध संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित असणारा प्रयोग किंवा प्रतिकृती विद्यार्थी स्वत:तयार करतात. दर रविवारी फक्त दोन तास ही शाळा भरते. पाठय़पुस्तकात शिकलेले विज्ञान प्रत्यक्षात कसे आणायचे..विविध वैज्ञानिक सिद्धांत, नियम स्वत: प्रयोग करून समजून घ्यायचे..त्यावर आधारित प्रकल्प, प्रतिकृती तयार करायची हे सर्व या शाळेत शिकविण्यात येते. इयत्ता तिसरी ते नववीचे विद्यार्थी या शाळेत सहभागी होऊ शकतात. प्रयोगांसाठी लागणारे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना आयोजकांमार्फत दिले जाते. तयार होणारे सर्व प्रयोग घरी घेऊन जाण्याची विद्यार्थ्यांना मुभा असते. वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या घरातच प्रयोगशाळा तयार होईल एवढे साहित्य त्यांच्याकडे जमा होते. या शाळेत ऊर्जा, पर्यावरण, वीज, अंतराळ, रसायन, जीवशास्त्र या विषयांवर आधारित ५० पेक्षा अधिक प्रयोग शिकविले जातात.
वाहत्या पाण्यापासून विद्युत निर्मिती, सौर उर्जेवर चालणारी कार, हायड्रीलिक आर्म, वातकुक्कुट यंत्र, पर्जन्यमापक, बॅरीमीटर तयार करणे, ज्वालामुखी, रसायनांच्या सहाय्याने वायू निर्मिती, मजेशीर रासायनिक प्रयोग, विद्युत घट तयार करणे, मायक्रोस्कोपच्या सहाय्याने सूक्ष्म जगाचा अभ्यास करणे, टेलिस्कोपच्या सहाय्याने आकाश निरीक्षण, सूर्यमालेची प्रतिकृती, आर्यभट्ट व इतर उपग्रहांच्या प्रतिकृती तयार करणे असे बरेच काही या कार्यशाळेत शिकविण्यात येणार आहे. दुसऱ्या श्रेणीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, रोबोटिक्स, सूक्ष्म जगाचा अभ्यास, प्रकाशशास्त्र, दैनंदिन जीवनातील रसायन शास्त्र, पर्यावरण हे विषय शिकविण्यात येतील. इयत्ता तिसरी व चौथीमधील विद्यार्थी हवा, संतुलन, सूर्यमाला, प्रकाश चुंबकत्व, ध्वनी, बल, स्वयंपाक घरातील विज्ञान आदी संकल्पनांवरील प्रयोग, फिल्म प्रोजेक्टर, पेरिस्कोप, नभांगण यांसारखे प्रकल्प तयार करतील.
विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जाणीव प्रगल्भ होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशासाठी शहरात महात्मा गांधी रोड, नाशिकरोड, गंगापूररोड आणि इंदिरानगर येथे ही शाळा कार्यरत आहे. आधिक माहितीसाठी ९८२३११४७७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चैताली नेरकर यांनी केले आहे.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत