२०१३ च्या अखेरच्या दिवशी व २०१४ च्या सुरूवातीला वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी दिवशी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर साहित्यिक साहित्य संमेलन घेत असल्याचे पत्रकार परिषदेत संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या वेळी ते म्हणाले,की हे साहित्य संमेलन ३१ डिसेंबर व १ जानेवारी या दोन दिवसात राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सहा सत्रात होणार आहे. या साहित्य संमेलनात विचारवंतांची भाषणे,कीर्तन, चर्चासत्र यांचे सादरीकरण होणार आहे. या संमेलनात अखिल भारत हिंदु महासभा कोल्हापूर जिल्हा व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्यिक कवी साहित्य संमेलनाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.एस.डी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी भाऊ सुरडकर मार्गदर्शन करणार आहेत. या साहित्य संमेलनाला सुरुवात भवानी मंडप येथून ग्रंथ दिंडी काढून होणार आहे. या वेळी महापौर प्रतिभा नाईकनवरे, विलास खानविलकर, अशोक बळीराम पोवार, विलास दाभोळकर आदींची उपस्थिती राहणार आहेत. पत्रकार परिषदेला विक्रमसिंह जाधव, दादासाहेब शुक्ल,सुधीर सरदेसाई, अजय सोनवणे,चंद्रशेखर द्राक्षे आदी उपस्थित होते.