कल्याण-डोंबिवली परिसरात बलात्कार, विनयभंगांच्या तक्रारी वाढल्या आहेत. जोपर्यंत अशा गुन्हेगारांना जन्मठेप, फाशीसारख्या शिक्षा दिल्या जात नाहीत तोपर्यंत या गुन्ह्य़ांचे उच्चाटन होणे खूप अवघड आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ांसाठी फाशी, जन्मठेपेसारख्या शिक्षांची कायद्यात तरतूद करावी या मागणीसाठी हजारो सह्य़ांचे निवेदन डोंबिवलीत तयार करण्यात आले आहे. हे निवेदन राज्यपाल के. शंकरनारायणन यांना पाठविण्यासाठी कल्याणच्या तहसीलदारांना देण्यात आले. भिवंडी लोकसभा युवक काँग्रेसतर्फे ही मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी, विशेषत: महिलांनी, या सह्य़ांच्या मोहिमेत विशेष सहभाग घेतला.