‘वादळवाट’, ‘रेशीमगाठी’ आणि ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘अरे वेडय़ा मना’ या मालिकेतील अभिनेत्री अनुराधा राजाध्यक्ष यांनी लिहिलेल्या ‘संवाद स्वत:शी’ या पुस्तकाचे प्रकाशन १० ऑगस्ट रोजी मुंबईत विलेपार्ले येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्टय़ म्हणजे पुस्तकातील काही भागावर एक लघुचित्रपट तयार करण्यात आला असून पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हा लघुचित्रपटही दाखविण्यात येणार आहे. तसेच ‘संवाद स्वत:शी’ हे पुस्तक या वेळी ‘ब्रेल लिपी’तूनही प्रकाशित केले जाणार आहे. यानिमित्ताने मराठीत ‘बुक ट्रेलर’ ही संकल्पना ‘यु टय़ूब’वर सादर केली जाणार आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता साठय़े महाविद्यालयाचे वातानुकूलित सभागृह, विलेपार्ले (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे.