नवीन वर्षांच्या खऱ्या सुटय़ांचे सुख गुरुजनांना मिळणार आहे. २०१५ मध्ये गुरुजींना ७६ शासकीय, उन्हाळ्याच्या २८ व दिवाळीच्या १८, अशा १२४ दिवस सुटय़ा मिळणार आहेत.
 २०१५ मधील धार्मिक सण, राष्ट्रीय उत्सव आणि महापुरुषांच्या जयंत्या, अशा एकूण २४, तर ५२ साप्ताहिक, अशा ७६ सुटय़ा शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. नव्या वर्षांत किती सुटय़ा असणार, त्या दिवशी काय करायचे, याचे नियोजन नोकरदार  दरवर्षी डिसेंबरअखेरीस करीत असतात. गतवर्षी रविवारीच तीन उत्सव आल्याने त्यांना २१ सुटय़ांवर समाधान मानावे लागले होते, पण यंदा तीन सुटय़ांची भर पडली आहे. बॅकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी बुधवार १ एप्रिलला सुटी असून ती केवळ बॅंकांपुरतीच मर्यादित आहे. शासकीय कार्यालयांना ही सुटी लागू होणार नाही. या ७६ सुटय़ांशिवाय राज्यातील सर्वच शिक्षकांना उन्हाळ्याच्या ३८ आणि दिवाळी १८ दिवस, अशा सुटय़ा मिळणार आहेत, पण त्यात लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, गुरुनानक जयंती आणि बुद्धपौर्णिमा, अशा चार सुटय़ा आणि सहा रविवार येत असल्याने त्यांना खऱ्या ४८ सुटय़ांचा लाभ घेता येईल. सोमवार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, मंगळवार १७ फेब्रुवारी महाशिवरात्री, गुरूवार १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २१ मार्च गुढीपाडवा, शनिवार २८ मार्च रामनवमी, गुरुवार २ एप्रिल महावीर जयंती, शुक्रवार ३ एप्रिल गुड फ्रायडे, मंगळवार १ मे महाराष्ट्र दिन, सोमवार ४ मे बुद्ध पौर्णिमा, शनिवार १८ जुलै रमझान ईद  शनिवार १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, मंगळवार १८ ऑगस्ट पारशी नववर्ष दिन, गुरुवार १७ सप्टेंबर गणेश चतुर्थी, शुक्रवार २५ सप्टेंबर बकरी ईद, शुक्रवार २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, गुरुवार २२ ऑक्टोबर दसरा, शनिवार २४ ऑक्टोबर मोहरम, बुधवार ११ नोव्हेंबर दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन, गुरुवार १२ नोव्हेंबर दिवाळी बलिप्रतिपदा, बुधवार २५ नोव्हेंबर गुरुनानक जयंती, गुरुवार २४ डिसेंबर ईद ए मिलाद. २०१५ मध्ये ईद ए मिलाद प्रेषित मोहंमद यांचा जन्मदिवस दोन वेळा येत आहे. २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुटी आहे.