देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचा उपक्रम
विदर्भासह देशभरात मोठय़ा प्रमाणात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना त्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेती विकसित करून मालाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देवलापारच्या गो विज्ञान अनुसंधान केंद्रातर्फे देशभरातील शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांंपासून शेती प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत देशभरातील १३ हजारच्यावर शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले असून त्यातील पाच हजारच्या जवळपास शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ झाल्याचा दावा केंद्रातर्फे करण्यात आला आहे. तर अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पंचगव्यापासून वेगवेगळ्या व्याधींवर औषधी निर्माण करण्यासोबतच गो विज्ञान अनुसंधान केंद्राने शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या कामधेनु ग्राम दत्त योजनेच्या माध्यमातून देशभरातील साडेचार हजार शेतकऱ्यांनी देवलापारमध्ये येऊन शेती विषयक प्रशिक्षण घेतले आहे.
गो विज्ञान अनुसंधान केंद्रातर्फे देवलापारमध्ये गाईच्या पंचगव्यापासून आयुर्वेदिक औषधी, खत आणि कीटक नियंत्रक बनविण्याच्या विविधपद्धती याबाबत वेगवेगळी शिबिरे आयोजित केली जातात. आजपर्यंत आसाम, बिहार, ओरिसा, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यातून व नेपाळ, अमेरिका देशातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. मनुष्याला उपयुक्त औषधी निर्माण करण्याबरोबरच येथे कृषी व्यवसायाला पुरक असे संशोधनही चालते. रासायनिक खतांचा वापर करून आज जमिनीची हानी होत असल्याचे पाहताना केवळ शेण-गोमुत्राच्या सा’ााने सेंद्रिय खत व िशग खत तयार करून त्यावर पीक उत्पादन घेणे शक्य असल्याचे येथे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. मरण पावलेल्या गाईच्या िशगात दुभत्या गाईचे गोमय भरून तीन खड्डय़ात ते विशिष्ट काळ पुरून ठेवल्यास उत्कृष्ट अणूखत तयार होते याची शास्त्रशुद्ध पद्धत या ठिकाणी विकसित झाली आहे. येथे खतांबरोबरच गोमूत्र व कडुिलब यांच्या साह्य़ाने उत्कृष्ट परिणामकारक कीटकनाशकही तयार केली जातात. ही कीटकनाशक इतर रासायनिक कीटकनाशकांप्रमाणे मनुष्यास मुळीच हानीकारक नाहीत. कीटकनाशकांसोबतच येथे वर्मीकंपोस्ट खत तयार केले जाते. कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्रात शेतकऱ्यांची शिबिरेही येथे आयोजित केली जातात. यात सातत्य व नियमितता आणण्याची कंेद्राची योजना आहे व त्यादृष्टीने तसे प्रयत्नही सुरू आहे. मनुष्याला हानीकारक व न परवडणाऱ्या रासायनिक खताच्या तुलनेत अतिशय किफायती व सहजसाध्य उत्पादन येथे निर्माण होते. गोवंशापासून मिळणारे गोमूत्र व शेण शेतीला सर्वोत्तम असून त्याद्वारे सेंद्रीय शेती सुद्धा करता येते. शेणापासून धूप, गोमुत्रापासून फिनाईल, गोवऱ्या व त्याचा अग्नीहोत्रात समावेश, मच्छर निरोधक उदबत्ती तयार केली जाते. खतनिर्मितीबरोबरच पंचगव्यातील घटक वापरून आंघोळीचा साबण, केसांना लावायला तेल, श्ॉम्पू, दंतमंजन इ. औषधी युक्त कॉस्मेटिक्सदेखील येथे बनवले जातात. याची उपयुक्तता जाणून अनेकांनी या वस्तूंच्या नियमित वापरास सुरुवात केली आहेत. असे हे अद्वितीय अनुसंधान कंेद्र भारताच्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला अत्यंत उपयुक्त व साह्य़कारी कार्य करीत आहे. जर्सी, होल्स्टिन जातीच्या गायींऐवजी साहिवाल, गीर, हरयाणा या शुद्ध भारतीय जनावरांची उपज वाढवून त्यांच्या साह्य़ाने संपूर्णत: स्वदेशी शास्त्र विकसित करण्याच्या सर्व कार्यास नामांकित वैज्ञानिकांनीही वाखाणले आहे. गोवंशाची उपयुक्तता औषधी क्षेत्रात सिद्ध करणे. गोवंशाच्या पंचव्याचे कृषिक्षेत्रात उपयुक्तता सिद्ध करणे, बैलाद्वारे छोटय़ा शेतीत सुधारित पद्धतीने शेतीला प्रोत्साहन देणे, ग्रामविकास कार्यप्रकल्पात गोसेवा अनुसंधान प्रकल्पाची अनिवार्यता सिद्ध करणे, वर्तमान स्थिती लक्षात घेता शास्त्रीयदृष्टय़ा प्रमाणित उत्पादन घेणे ही केंद्राची वैशिष्टय़े आहेत.
अशा प्रकारचे हजारो कंेद्र सर्व देशभरात स्थापन झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, प्रदूषण इ. समस्या कमी तर होतीलच पण त्याचबरोबरच ग्राम-स्वराज्य ही संकल्पना साकार होऊ शकेल, असा विश्वास गो विज्ञान कंेद्राचे कंेद्रीय प्रभारी सुनील मानसिंहका यांनी ही माहिती देताना व्यक्त केला.