मुंबई वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने उरण मधील कामगार नेते तुकाराम कडू यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. या पुरस्कारचे वितरण अभिनेते महेश कोठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड.एस.के.शेट्टे,नाटय़ कलाकार संजीवनी जाधवही उपस्थित होत्या.
जेएनपीटी कामगार वसाहतीत झालेल्या कार्यक्रमात कामगार क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी केल्या बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. बंदर कामगारांचे नेते डॉ.शांती पटेल यांच्या मार्गदर्शनाने काम करणाऱ्या तुकाराम कडू यांनी येथील प्रकल्पग्रस्तांच्या लढय़ातही महत्वाची कामगीरी बजावलेली आहे.जेएनपीटी बंदराकडून प्रकल्पग्रस्त अकरा गावांच्या विकासाठी मालमत्ता कर मिळावा याकरीत जेएनपीटी प्रकल्पग्रस्त सरपंच कमिटीच्या वतीने त्यांनी जेएनपीटी विरोधात केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील लढय़ामुळे ग्रामपंचायतींनी कोटय़ावधी रूपयांचा निधी मिळाला आहे.