होळी सणानिमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी बघता नागपूर-मुंबईदरम्यान दोन विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाडीची लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूरहून प्रत्येकी फेरी राहणार आहे.
०१०१७ एलटीटी- नागपूर विशेष गाडी बुधवारला रात्री १२.४५ वाजता कुल्र्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता नागपुरात येईल.
०१०१८ नागपूर-एलटीटी विशेष गाडी नागपूरहून गुरुवारी रात्री ९.१५ वाजता निघेल आणि कुल्र्याला दुसऱ्या दिवशी दुपारी १.१० वाजता पोहोचेल. ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक, ईगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबेल. या गाडीला १८ डबे राहतील. त्यात एक एससी टू टिअर, दोन एससी थ्री टिअर, सात शयनयान, सहा सामान्य आणि दोन एलएलआर डबे राहतील.