घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो, भाऊबीज असो की रमजान ईद, अशा उत्सवांची ते आतुरतेने वाट पाहात असतात. रक्षाबंधनानिमित्त देशभरातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून सैनिको हो तुमच्यासाठी.. अशी भावना व्यक्त करतात. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देत सी.पी. अ‍ॅन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी संचालित प्रहार मिलिटरी स्कूलच्या बालसैनिक आणि याच संस्थेच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांना राख्या पाठविल्या.   
प्रहार मिलिटरी स्कूल आणि सी. पी. अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयाच्या विद्याथ्यार्ंनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक, सुबक अशा १५ हजारांहून अधिक राख्या तयार करून एका समारंभात आज कामठीतील आर्मी पोस्टल सव्‍‌र्हिस सेंटरचे डेप्युटी कमांडंट कर्नल एस.बी. सिंग यांच्या सुपूर्द केल्या. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब महाजन, प्रहार संस्थेचे प्रमुख कर्नल सुनील देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद बारहाते, शिवाणी देशपांडे, रवीनगर शाळेच्या मुख्यध्यापकांसह संस्थेतील  शिक्षक उपस्थित होते.
यावेळी कर्नल एस.बी. सिंग म्हणाले, रक्षाबंधन असो की दिवाळी, अशा उत्सवांना सीमेवर देशाचे रक्षण करीत असलेले सैनिक घरी परत येऊ शकत नाही. त्यामुळे देशवासियांकडून त्यांना राख्या किंवा आपल्याकडील अनेक गोष्टी मिळाल्या की खूप आनंद होत असतो. केवळ एका संस्थेतर्फे हा कार्यक्रम साजरा होऊ नये. देशभर हा कार्यक्रम राबविला गेला पाहिजे. यातून सीमेवर असणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढते आणि विद्याथ्यार्ंमध्ये देशभावना निर्माण होते. पोस्ट सव्‍‌र्हिसच्या माध्यमातून सीमेवरील सैनिकांपर्यंत या राख्या पोहचविल्या जाणार असल्याचे कर्नल सिंग यांनी सांगितले.
यावेळी कर्नल सुनील देशपांडे म्हणाले, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची आठवण ही केवळ युद्धाच्यावेळी होत असते मात्र, त्यानंतर त्यांचा विसर पडतो. पाकिस्तानचे सैनिक भारतीय सैनिकांवर हल्ले करीत असले तरी भारतीय सैनिक त्याला सडेतोड उत्तर देत आहेत. प्रहारमध्ये सैनिकी शिक्षण घेतलेले अनेक युवक आज देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करीत आहेत. ते सीमेवर कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात याची अनेकांना कल्पना नाही. सैनिकांना फक्त प्रेम हवे आणि ते मिळाले की त्यांचे आत्मबल वाढत असते. राखी म्हणजे केवळ रेशमी धागा नाही तर त्या धाग्यापासून त्यांना एक वेगळी शक्ती मिळत असते, असेही कर्नल देशपांडे म्हणाले. प्राचार्य मिलिंद बारहाते यांनी प्रास्ताविक केले. प्रहारच्या चिमुरडय़ांनी यावेळी कर्नल नाईक यांना राखी बांधून सीमेवरील सैनिकांसाठी राख्या भेट दिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रारंभी प्रहारच्या विद्यार्थ्यांंनी देशभक्ती गीत सादर केले.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!