वाशी सेक्टर-१० अ मधील अनेक सोसायटींचे मल चक्क जवळच्या होल्डिग पॉण्डमध्ये सोडले गेले आहे. येथील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार करूनही पालिका अधिकारी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत असल्याचे दिसून येते. हे अस्वच्छ, दरुगधीयुक्त पाणी होल्डिंग पॉण्डमध्ये गेल्याने सकाळ-संध्याकाळ किनाऱ्यावर चालणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत घेऊन प्रदक्षिणा मारावी लागत आहे.
नवी मुंबईचा मेक ओव्हर करताना सिडकोने २५-३० वर्षांपूर्वी टाकलेल्या मल व जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी हे आवश्यक असल्याचे कारण देऊन या दोन कामांवर सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च  करण्यात आले. त्यात अनेकांनी चांगभलं करून घेतल्याने या दोन्ही कामांचा दर्जा अनेक ठिकाणी संशयास्पद आहे. त्यात मलवाहिन्यांच्या कामात मुख्य रस्त्यांच्या खालून जाणारी मलवाहिनी तर बदलण्यात आली पण सोसायटी, चाळी, गावामधून येणाऱ्या छोटय़ा छोटय़ा मलवाहिनींचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. त्यामुळे या दोन मलवाहिन्यांचा मेल कुठे जुळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मुख्य मलवाहिन्या राहिल्या वर आणि त्यांना जोडणाऱ्या छोटय़ा वाहिन्या राहिल्या खाली असे चित्र सध्या नवी मुंबईत ठिकठिकाणी दिसून येत आहे. वाशी सेक्टर दहा-अ मधील समुद्रिका, ऊर्जा, सागरिका आणि रिमझिम गृहनिर्माण सोसायटींच्या समोर हा प्रकार झालेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या सोसायटींमधून निघणारे सांडपाणी, मल समोरच्या होल्डिंग पॉण्डमध्ये चक्क सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरत असून सकाळ-संध्याकाळ खाडीकिनारी असलेल्या सी-शोअरच्या जॉिगग ट्रॅकवर चालणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत घेऊनच चालावे लागत आहे. येथील ऊर्जा सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ दुखंडे यांनी अनेक वेळा पालिकेकडे या प्रकाराची लेखी तक्रार केली आहे तसेच स्थानिक नगरसेवकाच्या कानावरदेखील हा प्रकार घातला गेला आहे पण परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने आता दाद मागायची कोणाकडे, अशी स्थिती रहिवाशांची झाली आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला