तरीही सामान्यांच्या खिशापासून दूर

गेले काही महिने प्रचंड महागाईने सर्वसामान्य जनता पिचून गेली आहे. मात्र, विविध कारणांमुळे सध्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य आणि भाज्यांची मोठी स्वस्ताई झाली आहे. भाज्यांचा तर जणू महापूरच वाहू लागला आहे. काही दिवस का होईना ‘१० रुपयांत दिवसभराची भाजी खरेदी करण्याची चैन’ ग्राहकांना करता येण्याची शक्यता आहे. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांच्या नफेखोरीने या चैनीला नख लावले आहे. ‘एपीएमसी’तील घाऊक व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाईची भाषा करणारे सरकार किरकोळ व्यापाऱ्यांच्या नफेखोरीला कधी चाप लावणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

राज्य सरकारने मालाच्या विक्रीवरील कमिशन कमी केल्याने अस्वस्थ झालेल्या पुणे बाजार समितीमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्याने मुंबईतील बाजारपेठेत सध्या भाजीपाल्याचा जणूकाही ‘महापूर’ येऊ लागला आहे. यामुळे पुढील काही दिवस उत्तम दर्जाची आणि स्वस्त भाजी मुंबईकरांना मिळू शकेल, असे आशादायक चित्र घाऊक बाजारात निर्माण झाले आहे. पण.. भाज्यांची आवक उदंड असली आणि त्यांचे भावही अगदी कमी असले तरी ग्राहकांना मात्र त्याचे समाधान मिळण्याची शक्यता कमीच दिसते आहे. याचे एकमेव कारण किरकोळ व्यापाऱ्यांची ग्राहकांना नाडण्याची आणि अव्वाच्या सव्वा नफेखोरी करण्याची वृत्ती हे आहे. त्यामुळेच घाऊक बाजारातील स्वस्ताई अजूनही किरकोळ बाजारात अवतरलेली नाही.
आवक वाढल्याने घाऊक बाजारात कोबी, फ्लॉवर यासारख्या भाज्या किलोमागे अवघ्या तीन ते चार रुपयांना विकल्या जाऊ लागल्या आहेत. उत्तम दर्जाचा वाटाणा २५ रुपयांपर्यत घसरला आहे. असे असले तरी मुंबईतील दादर, गिरगाव, विलेपार्ले, मुलुंड यासारख्या उपनगरांमध्ये चांगला दर्जाचा कोबी, फ्लॉवर प्रतिकिलो २० रुपयांपासून अगदी ३० रुपयांपर्यंत तर  वाटाणा ४० ते ४५ रुपयांनी विकला जात आहे. ठाण्यातील गावदेवी मार्केटमध्ये टॉमेटोचे दर २५ रुपये आहेत, तर पाचपाखाडी भागात त्याच दर्जाचा टॉमेटो ३० रुपयांनी विकला जात आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारपेठेस लागूनच असलेल्या वाशीतील किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनी तर सर्वावर कडी केली आहे. वाशी सेक्टर ९ येथील मोठय़ा किरकोळ बाजारात फ्लॉवर-४०, कोबी-४०, टॉमेटो-५० अशा सर्वच भाज्या अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जात आहेत. त्यामुळे एपीएमसीमधील घाऊक बाजाराच्या नावाने गळा काढणाऱ्या राज्य सरकारचे किरकोळ बाजारावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे.
मुंबईतील बाजारपेठेस पुणे तसेच नाशिक जि’ाांमधून मोठय़ा प्रमाणावर भाज्यांचा पुरवठा होतो. याशिवाय गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतूनही मुंबईत भाजी येत असते. तरीही मुंबईकरांना लागणारी ८० टक्के भाजी पुणे व नाशिक जि’ाातूनच येते. साधारणपणे पावसाळा सुरू होताच मुंबईच्या घाऊक बाजारपेठेत उत्तम दर्जाच्या भाज्यांची आवक होऊ लागते. यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्याने चांगली आणि स्वस्त भाजी मुंबईकरांना फारशी दिसलीच नाही. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यासारख्या तेजीच्या हंगामात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशीतील घाऊक बाजारपेठेत भाज्यांचा दुष्काळ होता. गेल्या महिनाभरापासून मात्र हे चित्र झपाटय़ाने बदलू लागले आहे. पुणे, नाशिक जि’ाातून उत्तम दर्जाची भाजी मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. अपुऱ्या पुरवठय़ामुळे महागाईचे टोक गाठलेला वाटाणाही आता मुबलक मिळू लागला आहे.
एकीकडे हिरव्यागार भाज्यांनी एपीएमसी बाजाराचे आवार फुलून गेले आहे. त्यातच पुण्यातील भाजी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे तेथील सारा माल मुंबईकडे येऊ लागला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना स्वस्त आणि मस्त भाजीखरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
कृषी मालाच्या विक्रीवर देण्यात येणाऱ्या कमिशनच्या मुद्दयावरून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील एरवी या बजारपेठेत भाजीपाल्याने भरलेल्या सुमारे ४५० ते ५०० गाडय़ा येतात. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांपासून थेट पणनची परवानगी दिल्याने मुंबईत साधारणपणे ५० ते ७० गाडय़ा परस्पर जातात. त्यामुळे चांगला हंगाम असताना मुंबई, ठाण्यात साधारपणे ५५० ते ६०० गाडय़ा भाजीपाला जात असतो. पुणे बाजार बंद झाल्याने सोमवारपासून वाशी बाजारात सरासरी ५५० गाडय़ांची आवक होऊ लागली आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर िपगळे यांनी दिली. यामुळे सर्वच भाज्यांचे दर कमी झाले असून काकडी, कोबी, फ्लावर, पडवळ, टॉमेटो अशा सर्वच भाज्या स्वस्त दरात मिळू लागल्या आहेत.