मध्य नागपूर
केवळ नागपूरचेच नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान असलेल्या मध्य नागपुरात गेल्या विधानसभा निवडणुकीत कमळ फुलल्यानंतर यावेळी पुन्हा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी भाजपला सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला आणि अखेर कमळ फुलले.
मुस्लिम आणि हलबा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघावर भाजपच्या अनेक नेत्यांनी दावे केले होते. गेल्या पाच वर्षांत विकास कुंभारे यांच्यावर केवळ एकाच समाजासाठी कामे केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळते की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र,  भाजपने कुंभारे यांच्या विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे अनिस अहमद या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ बदलून पश्चिम नागपुरातून निवडणूक लढविली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. यावेळी अहमद पुन्हा एकदा मध्य नागपुरात परतले आणि त्यांनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली.
काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे अहमद यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यांनी समाजाच्या आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दिवस रात्र प्रचार केला. दुसरीकडे काँग्रेसच्या बंडखोर महिला उमेदवार आभा पांडे मैदानात उतरल्यामुळे काँग्रेसची पंचाईत झाली होती. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही, असे पक्षाला वाटत होते. राष्ट्रवादीने कमाल अंसारी यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे दुसरा मुस्लिम चेहरा दिल्यामुळे मुस्लिम समाजाच्या मतांमध्ये मतविभाजन होईल, असे वाटत होते मात्र ते सहा हजारपेक्षा जास्त मत घेऊ शकले नाही.
आभा पांडे यांनी पाच हजाराचा पल्ला गाठला नाही. बसपाचे ओंकार अंजीकर यांचा मतदारांवर फारसा प्रभाव पडलेला नाही त्यामुळे त्यांची जमानत जप्त झाली आहे. अहमद यांच्या पराभवामागे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि त्यांना स्थानिक कार्यकत्यार्ंकडून असलेला विरोध ही प्रमुख कारणे आहेत तर कुंभारे यांच्या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आणि नितीन गडकरी यांचे मतदार संघावर असलेले वर्चस्व हा बाबी आहे.  
मध्य नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, येथून सलग तीनवेळा विद्यमान मंत्री अनिस अहमद विजयी झाले होते, यावेळी मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने अनिस पश्चिममध्ये गेले. त्यामुळे मध्यमध्ये काँग्रेसने डॉ. राजू देवघरे हा नवा चेहरा दिला. भाजपने गेल्यावेळचे पराभूत उमेदवार विकास कुंभारे यांना उमेदवारी दिली. बसपाने माजी नगरसेवक गनी खान यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने मुस्लिम उमेदवार न दिल्याने नाराज झालेला हा समाज गनीखान यांच्या पाठीशी एकसंघपणे उभा राहिल्याने भाजपच्या विकास कुंभारे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा कल धक्का देणारा ठरला.