देशातील ८५ कोटी हिंदूची आस्था असणारे अयोध्या येथील रामजन्मभूमी व राममंदिराला, तसेच हिंदुत्वाला समर्थन देणाऱ्या राजकीय पक्षालाच विश्व हिंदू परिषद समर्थन देईल. भाजपने आपल्या निवडणूक घोषणापत्रात याचा उल्लेख न केल्यास विश्व हिंदू परिषद समर्थन देणार नाही. कॉंग्रेसने हिंदुत्वाचे समर्थन केले तर विश्व हिंदू परिषद कांॅग्रेसला समर्थन देईल. गुढीपाडव्यापासून संपूर्ण देशात राममंदिर निर्मितीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ३३ दिवस ‘श्रीराम जपो महायज्ञ’च्या द्वारे संपूर्ण देशातील वातावरण राममय केला जात असल्याची माहिती वििहपचे विदर्भप्रांत संयोजक राजू वालिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विदर्भप्रांतचे मंत्री प्रा.संजय निलमावर, बजरंग दलाचे प्रांत संयोजक देवेश मिश्रा, सुबोध आचार्य, नागपूर, भिकमदास शर्मा, मंगलाताई जैसवाल, मातृशक्तीच्या वंदना पाठक , दुर्गावाहिनीच्या सोनिया निर्वाण, इतर पदाधिकारी व कार्यकत्रे उपस्थित होते. राजू वालिया यांनी कांॅग्रेसवर हल्लाबोल करून हिंदूसाठी तयार झालेल्या भारतात कॉंग्रेस फक्त मतांच्या राजकारणाकरिता अल्पसंख्याकांना झुकते माप देत आहे. त्यांना अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा गरज नसतांना पुरवित आहे. एवढेच नाही, तर त्यांना कुटुंब नियोजनातूनही सूट देण्यात आली आहे. उलट, हिंदूना भगवा आतंकवाद व शिख आंतकवाद या नावाने बदनाम करणारी सरकार मुस्लिम आतंकवाद केव्हा घोषित करणार आहे? लखनौ हायकोर्ट बेंचसमोर १९९४ मध्ये केंद्र शासनाच्या वतीने रामजन्मभूमी प्रकरणी ही जागा ज्या समाजाची आहे हे प्रमाणित झाल्यास ती जागा त्या समाजाला दिली जाणार व शासन विकसित करणार, असे शपथपत्र दिले गेले होते. रडार तंत्राने रामजन्मभूमीची तपासणी केली असता व भारताच्या पुरातत्व विभागाने त्या ठिकाणी ५४ स्तंभांचे ३३०० वर्षे जुने राममंदिर असल्याचे प्रमाणित केल्यानंतरही केंद्रशासन संसदेत कायदा करीत नाही. केंद्र शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ही बाब देशातील ८५ कोटी हिंदू सहन करणार नाहीत.
यासाठी विहिपतर्फे सर्व खासदारांना निवेदन देण्यात आले. तसेच नुकत्याच झालेल्या अलाहाबाद येथील महाकुंभ मेळाव्यात देशातील २ लाख साधुसंतांनी राममंदिराचा प्रश्न सुकर व्हावा, यासाठी गुढीपाडव्यापासून ३३ दिवस ‘श्रीराम जयराम जयजय राम’, या मंत्राचा जप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. विदर्भातील २ लाख घरांमध्ये हे जप सुरू झाले आहेत. ६५ हजार कोटी जपातून ५ हजार सिद्धक्षेत्र निर्माण होतील.
याशिवाय, विदर्भातील २७ ठिकाणी विद्यार्थी व तरुणांसाठी सामूहिक जप केंद्रात सतत १३ तास जप केला जाईल. विश्व हिंदू परिषद जुल २०१३ पर्यंत राममंदिराचा मुद्दा सुटण्याची वाट पाहणार आहे. त्यानंतर साधुसंतांच्या विचाराने आक्रमक आंदोलन संपूर्ण देशात छेडले जाईल, अशी माहिती राजू वालिया व प्रा.संजय निलावार यांनी दिली.