मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मतदान यंत्राच्या वापरामुळे पहिल्या दोन तासात मतदारांचा कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्य़ातील १२ मतदारसंघाची मतजमोजणी १२ ठिकाणी होत असून, रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. नागपूर शहरातील सहा आणि ग्रामीणमधील सहा मतदारसंघात एकचवेळी मतमोजणी होत होणार आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमानगर येथे पूर्व नागपूर मतदारसंघाची मतमोजणी होत आहेत. त्यासाठी २० टेबल राहणार आहेत. पश्चिम नागपूर मतदारसंघाची मतमोजणी काटोल रोडवरील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात केली जाणार आहे. एकाचवेळी २० टेबलवर ही मोजमोजणी होईल. उत्तर नागपूर मतदारसंघाची मतमोजणी काटोल रोडवरील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत केली जाणार आहे. येथे देखील २० टेबलांवर एकाचवेळी मतमोजणी केली जाणार आहे. दक्षिण नागपूर मतदारसंघाची मतमोजणी सीताबर्डी येथील सांस्कृतिक बचत भवन येथे केली जाणार आहे. येथेही २० टेबलांची व्यवस्था करण्यात येणार आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाची मतमोजणी श्रद्धानंदपेठेतील कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूलमध्ये केली जाणार आहे. या मतमोजणी केंद्रावर देखील २० टेबलावर मतमोजणी करण्यात येईल. मध्य नागपूर मतदार संघाची मतमोजणी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, शेतकरी वसतिगृह (भवन), फुटाळा तलाव मार्ग, तेलंगखेडी येथे होणार आहे. मतमजोणीला १४ टेबलांवर एकाचवेळी प्रारंभ होईल. काटोल मतदारसंघाची मतमोजणी शेती उत्पादक वितरण समिती (एपीएमसी) फली मार्केट काटोल येथे होणार आहे. सावनेर मतदारसंघाची मतमोजणी सावनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत होईल. हिंगणा मतदार संघाची मतमोजणी हिंगणा तहसील कार्यालयात होणार आहे. उमरेड मतदारसंघाची मतमोजणी उमरेड येथील नूतन आदर्श महाविद्यालयात केली जाणार आहे. कामठी मतदारसंघाची मतमोजणी मौदा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत होणार आहे. रामटेक मतदारसंघाची मतजमोजणी रामटेक, वाहीटोला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये होणार आहे.विदर्भातील ६२ मतदारसंघातील २००९- २०१४ ची अंतिम टक्केवारीमतदारसंघ २००९ २०१४नागपूर पश्चिम ४६.९६ ५२.१४मध्य नागपूर ५०.७६ ५५.१२पूर्व नागपूर ५६.८५ ५६.२८दक्षिण-पश्चिम ४७.५८ ५६.२२दक्षिण नागपूर ४९.८ ५३.२२उत्तर नागपूर ४८.०२ ५३.५५काटोल ६४.८९ ७०.३८सावनेर ७०.१९ ६८.९१हिंगणा ५८.५३ ६५.९९ उमरेड ६२.७८ ६५.८१कामठी ५८.८२ ६२.२५रामटेक ६४.७६ ६८.६१बुलढाणा ५१.२२ ५९.८९ मलकापूर ६७.७३ ६६.४०चिखली ६६.६४ ६८.२३सिंदखेड राजा ६६.२४ ६४.७४मेहकर ६३.५१ ५९.८०खामगाव ७२.३४ ७२.९१जळगाव जामोद ६८.८१ ७२.५८वाशीम ५४.३८ ५७.२०कारंजा ६४.४७ ६३.२३रिसोड ६३.३७ ६३.१३वर्धा ६०.७३ ५१.१३हिंगणघाट ६७.४४ ७१.७५आर्वी ६७.३५ ६८.१३देवळी ६६.१८ ६७.९२चंद्रपूर ४९.९९ ५४.०७चिमूर ७१.५१ ७४.५५बल्लारपूर ६१.०८ ६३.१८राजुरा ६७.३३ ७०.८०ब्रम्हपुरी ६६.७९ ७४.८७वरोरा ६३. ८६ ६४.८१अमरावती ५५.७४ ५५.७४धामनगावरेल्वे ६७.३१ ६८.३७तिवसा ६०.५९ ६२.८२दर्यापूर ५८.४० ६४.६४मेळघाट ६८.०२ ६८.०३अचलपूर ६४.९२ ७०.३७बडनेरा ५६.०९ ५६.०८अकोला पश्चिम ४८.४८ ५१.५७अकोला पूर्व ५३.७४ ५५.७८अकोट ६१.८९ ६०.७१बाळापूर ५७.४८ ५९.९६ मूर्तीजापूर ४९.९४ ५३.१०भंडारा ६४.८२ ६८.२२तूमसर ६९.४३ ७१.४४साकोली ७३.२७ ७३.७०गोंदिया ६४.९३ ६६.२३अर्जूनी ७३.५९ ७१.४६आमगाव ६९.८० ६९.६२ तिरोडा ७२.१८ ६९.७५यवतमाळ ५१.२२ ५८.६७वणी ७०.४० ७२.६७राळेगाव ६४.४४ ६७.४०पुसद ६२.९० ६१.२३उमरखेड ६२.२६ ६७.०२गडचिरोली ६५.०० ५८.२४आरमोरी ६२.०० ७१.९० अहेरी ६०.०० ७०.०१दिग्रस ५६.०९ ६७.८८आर्णी ६०.०७ ६९.११