नाशिकरोड विभागातील सामनगाव रस्त्यावर शासकीय तंत्रनिकेतन जवळील जलकुंभ भरणारी ऊध्र्व वाहिनी तुटल्याने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे शुक्रवारी सकाळी या जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. यामुळे चेहेडी गाव व मळे भाग, सामनगाव रस्ता परिसर, अश्विनी कॉलनी, जयप्रकाशनगर, चेहेडी पंपिंग स्टेशन परिसर, बनकर मळा, खर्जुलनगर, गोरेवाडी व शास्त्रीनगर, अस्वले मळा, चिडे मळा, रेल्वे ट्रॅक्शनसमोरील परिसर, संभाजीनगर या भागांत शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. उपरोक्त भागात सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.