सेंट्रल इंडिया टेस्ट टय़ूब बेबी सेंटर, स्त्रीरोग संघटना व फॉग्सी इन्डोस्कोपी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २९ आणि ३० नोव्हेंबरला हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये ‘हिस्ट्रोस्कोपी’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन उद्या, शनिवारी दुपारी १२.३० वाजता अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप गोडे, महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून इजिप्तचे जागतिक दर्जाचे हिस्ट्रोस्कोपी शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. ओसामा शावकी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सकाळी ८ वाजता  वैज्ञानिक सत्राला सुरुवात होईल. यानंतर ‘कॅप्सुल-हाऊ शुड आय बिगेन’ या विषयावर चर्चासत्र होईल. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात ‘हिस्ट्रोस्कोपी’ या विषयावर डॉ. ओसमा शावकी मत मांडतील. यानंतर डॉ. केदार पडते, डॉ. मिलिंद शाह, डॉ. राजेश मोदी, डॉ. पी.जी. पॉल, डॉ. रोहिणी देशपांडे, डॉ. रीता बिलिंगडे, डॉ. विवेक साळुंके, डॉ. मनीष बाहेती हिस्ट्रोस्कोपीवर चहुअंगाने प्रकाश टाकतील. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता होणाऱ्या सत्रात ‘हिस्ट्रोस्कोपी चाचण्या’ या विषयावर डॉ. राजेंद्र संकपाळ, डॉ. नोझर शेरीयार, डॉ. बी. रमेश, डॉ. कृष्णकुमार, डॉ. नगेंद्र सरदेशपांडे, डॉ. भारती ढोरेपाटील, डॉ. शिनजीनी पांडे, डॉ. वामन घोडके विचार मांडतील. दुपारी ३.३० वाजता गटचर्चा होईल. या कार्यशाळेला ७०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.