घरगुती वादातून नेरूळ येथे एका तरुणाने चाकूने गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वसंत शेट्टी असे या तरुणाचे नाव आहे.
नेरूळ एमआयडीसीमधील हॉटेल आमंत्रण शेजारी राहणारा असून घरात असलेल्या चाकूने त्याने गळा कापून घेतला होता. सुदैवाने हा प्रकार आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी प्राथमिकता घरगुती वादातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.