मेष

वादग्रस्त पर्व संपेल
मेष व्यक्तींना बुध, गुरू, शुक्र यांच्या शुभ परिणामांचे प्रतिसाद उपयुक्त ठरू लागतील. गुरुवारी मंगळाचे राश्यांतर होताच शनी-मंगळातील वादग्रस्त पर्व संपुष्टात येईल. कार्यमार्ग निर्वेध होत राहील. मिळणारे यश व्यापक करता येईल. शुक्रवारच्या बुध, शुक्र युतीच्या आसपास काही घटना दीर्घकाळ स्मरणात राहणारी सफलता देऊ शकतील. व्यापारी सौदे, अर्थप्राप्ती, नवे अधिकार, शिक्षणात मिळणारे यश यांचा समावेश त्यात होऊ शकतो. शनी-राहूची चिंता नको.
दिनांक : २२, २३, २४ शुभकाळ.
महिलांना : नव्या संधी, नवे मार्ग यश निर्दोष करतील. त्यात प्रपंच, सामाजिक कार्ये, अर्थप्राप्ती यांचा समावेश राहील.













30.00








