सध्या शहरातील वाढत्या ट्रॅफिकमुळे गिअरलेस स्कूटर घेण्याकडे कल वाढत असला तरी आपल्याकडे शहरांतून तसेच निमशहरी व ग्रामीण भागातून अजूनही मोटरसायकल घेणारे चाहते खूप आहेत. मोटरसायकलची विक्रीवाढीचा दर मंदावला असली तरी विक्रीत सातत्य आहे. त्यामुळेच कंपन्या मोटरसायकल या अधिक आकर्षक म्हणजे स्टाइल, फीचर्स याबरोबर मायलेज फ्रेडली कशा होतील यावर भर देत आहेत. मास मार्केट मोटरसायकल युगाची सुरुवात तत्कालीन हीरो-होंडा कंपनीने केली असे म्हणता येऊ  शकते. कारण मास मार्केट सेगमेंट मोटरसायकल ही सर्वसामान्यांना परवडेल, अशीच सुरुवातीपासून डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे तीन दशकांमध्ये देशातील मोटरसायकल बाजारपेठेत स्थित्यंतरे आली असली तरी मास मार्केट मोटरसायकलचाच दबदबा एवढय़ा मोठय़ा कालावधीनंतरही बाजारपेठेवर आहे.

यात फरक एवढाच झाला आहे, की पूर्वी मास मार्केट सेगमेंटमधील मोटरसायकल या ग्राहकाची गरज पूर्ण करण्याच्या हेतूने विकसित होत होत्या आणि आता त्यात स्टाइल एलिमेंट वाढला आहे. त्यामुळे मास मार्केट म्हणजे १०० ते ११० सीसी च्या मोटरसायकलना प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि काही अंशी तो यशस्वीही झाला आहे. हे करताना मात्र ग्राहकाच्या खिशाला चाट न लागता त्याला चांगले उत्पादन देण्यात कंपन्या यशस्वी होत आहेत. अशा डिझाइन फिलॉसॉफीवर होंडा कंपनीने एक मोटरसायकल ११० सीसी सेगमेंटमध्ये लाँच केली आहे.

मायलेज : शहरात लिवो प्रति लिटर ६० ते ६५ किमीचे मायलेजच देते. काही वेळा हे अधिकही असू शकते. लिवो डिस्कब्रे व ड्रम ब्रेक या दोन पर्यायांत उपलब्ध आहे. स्पर्धक मोटरसायकलच्या तुलनेत लिवो महाग आहे. पण,  होंडाचा ब्रॅण्ड, रिसेल व्हॅल्यू व कॉम्प्युटरमध्ये प्रीमियम मोटरसायकल घेऊ  इच्छिणाऱ्यांसाठी लिवो एक पर्याय ठरू शकते.

इंजिन

मोटरसायकल कॉम्प्युटर सेगमेंटमधील असल्याने यास ११० सीसी सिंग सिलिंडर एअरकूल्ड, फोर स्पीड इंजिन आहे. मोटरसायकलचा पिकअप चांगला असून, स्मूथ आहे. ताशी साठ ते सत्तरच्या स्पीडला मोटरसायकल चालविताना व्हायब्रेशन जाणवत नाही. मात्र, त्यापुढे स्पीड गेल्यावर व्हायब्रेशन जाणवू लागतात. कंपनीने मोटरसायकलाच कमाल प्रति ताशी वेग ८६ किमी दिला आहे. पण, इकॉनॉमी स्पीडने मोटरसायकल चालविल्यास इंजिनचे आयुष्य चांगले राहते तसेच, प्रवास सुरक्षित पद्धतीने करता येतो. मोटरसायकलला पुढील बाजूस टेलिस्कोपिक व मागील बाजूस स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक शॉकअबसॉर्बर दिले आहेत.

स्टाइल

होंडाची लिवो पाहताच क्षणी कॉम्प्युटर सेंगमेंट म्हणजेच मास मार्केटमधील प्रीमियम मोटरसायकल वाटते. तसेच, पाहिल्यावर पारंपरिक शंभर सीसी मोटरसायकलपेक्षा मोठी असल्याचा भासही होतो आणि हेच मोटरसायकलच्या डिझाइनचे यश म्हणावे लागेल. लिवो मोटरसायकलमध्ये काही डिझाइन एलिमेंट हे होंडाच्याच अन्य मोटरसायकलाच भास निर्माण करतात. मोटरसायकलचा हेड लॅम्प हा युनिकॉर्न १६० सारखा वाटतो. लिवोच्या हेड लॅम्पला एअर डक्ट दिले आहेत. त्यामुळे हवेचा दाब कमी होण्यास मदत होते. लॅम्पला वरील बाजूस देण्यात आला काळ्या रंगातील काउल एक चांगली छाप सोडतो. टँकला मस्क्युलर लुक देण्यासाठी साइड फेरिंग दिली असून, त्यावर कंपनाचा लोगो आहे. कंपनीने लिवो आकर्षक दिसण्यासाठी स्टिकरचाही पर्याय दिला आहे. इन्स्ट्रमेंट पॅनल डिजिटल नाही. मात्र, त्याचा आकार पारंपरिक गोल पद्धतीचा नाही. ट्रिप मीटर, फ्यूएल गॅग व इंडिकेटर ब्लिंकर दिला आहे.  एक्झॉस्ट काळ्या रंगात असून, त्याला दोन मफलर गार्ड दिली असून, एक क्रोम प्लेटिंगचे आहे. तसेच, ग्रॅब रेल काळ्या रंगाचे डिझायनर दिले आहे. सेमी स्पोर्टी लुक असणारे टेल लॅम्प दिला आहे. या सगळ्यांमुळे मोटरसायकल अधिक आकर्षक वाटते.

obhide@gmail.com