गेल्याच महिन्यात अमेरिकेतल्या अ‍ॅरिझोना प्रांतात एक छोटासा अपघात झाला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्यातून एक मुद्दा चच्रेला आला. तो हा की, स्वयंचलित कार कितपत सुरक्षित आहेत. कारण ज्या गाडीला अपघात झाला ती होती उबरची स्वयंचलित कार. अर्थात अपघातात त्या बिचाऱ्या स्वयंचलित कारचा काहीही दोष नव्हता. दुसरी गाडीच येऊन तिला धडकली. तरीही चर्चा सुरू झालीय ती स्वयंचलित कारच्या भवितव्याविषयी..

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
Loksatta editorial Summer water scarcity problem in Maharashtra state
अग्रलेख: टंचाईचे लाभार्थी..

आपला प्रवास अधिकाधिक सुरक्षित आणि आरामात व्हावा असे कोणाला नाही वाटत. प्रवास सुखाचा झाला तर इच्छित स्थळी पोहोचून तेथील आपले ईप्सित साध्य करण्यातही आनंद वाटतो. त्यामुळेच आज जगभरातील कारनिर्माते आपल्या ग्राहकांना अधिकाधिक सुखी कसे करता येईल, त्यासाठी त्यांना अत्याधुनिक गाडय़ा कशा देता येतील, याचाच सातत्याने विचार करीत असतात. गाडी चालवताना चालक, प्रवासी सुरक्षित कसे राहतील, याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाऊ लागले आहे. त्यामुळेच अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा गाडय़ा आपल्याकडे दिसू लागल्या आहेत. त्यातच आता स्वयंचलित गाडय़ांची संकल्पना उदयास येऊ लागली आहे. गुगलपासून उबर, निस्सान वगरे डझनभर कारनिर्माते आता या स्वयंचलित गाडय़ांच्या निर्मितीच्या स्वप्नाने झपाटले आहेत. त्यामागील प्रत्येकाची प्रेरणा वेगवेगळी असली तरी ग्राहकाचे हित हा त्यातील एक समान धागा. खरेच का स्वयंचलित गाडय़ा अतिसुरक्षित असतील. अ‍ॅरिझोनातील घटनेमुळे यावर आता पुन्हा विचारमंथन होण्यास सुरुवात झाली आहे.

आपल्याला स्वयंचलित गाडय़ांची गरज आहे का?

अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बारकाईने विचार केला तर असे आढळून येते की, जगभरातल्या तब्बल १२० कोटी कार दिवसभरातल्या एकूण वेळेच्या ९५ टक्के नुसत्या रिकाम्या पडून असतात. त्यामुळे समजा सर्व गाडय़ा स्वयंचलित केल्या आणि त्यांचा योग्य ठिकाणी वापर करायचे ठरवले तर या १२० कोटी गाडय़ांपकी ९० टक्के गाडय़ा रस्त्यावरून हद्दपार होतील आणि आज जो अनेक शहरांचा डोकेदुखी बनलेला वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, तो कायमचा संपेल, असा विचार उबर कंपनी करते. रस्त्यावर जेवढय़ा गाडय़ा कमी तेवढी पाìकगची अडचण कमी आणि मग त्यापाठोपाठ इंधन वापरात आणि पर्यायाने प्रदूषणातही घट होईल, हे वेगळे सांगायला नकोच. स्वयंचलित कारमुळे अपघातांचे प्रमाणही कमी होईल. स्वयंचलित कार का हव्यात, याची ही कारणे.

काही विशेष कायदे आहेत का..

अजून तरी असे कायदे बाल्यावस्थेत आहेत, असेच म्हणावे लागेल. स्वयंचलित कारच्या रस्त्यांवरील चाचण्यांसाठी नियमावली तयार करणारे कॅलिफोíनया हे अमेरिकेतले पहिले राज्य ठरले आहे. गाडी स्वयंचलित असली तरी तिच्या चाचणीच्या वेळी गाडीत चालक असायलाच हवा, असा दंडक या नियमावलीत आहे. कारण रस्त्यावरून स्वयंचलित वाहन जात असेल तर गाडीत ड्रायव्हर नाही, हे पाहूनच समोरच्यांना धक्का बसू शकतो, असे होऊ नये आणि गाडीच्या व रस्तासुरक्षेसाठी म्हणून हा दंडक आखून देण्यात आला आहे.

निर्मितीतून काय साध्य करायचंय..

उबरला प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक प्रकारची विश्वासार्ह वाहतूक यंत्रणा विकसित करायची आहे. निस्सानला चालकांवरील ताण कमी करून त्यांना ड्रायिव्हगचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी स्वयंचलित कार हवी आहे, तर मर्सडिीजला आपल्या ग्राहकाला तो प्रवास करीत असताना त्याच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करता यावे, वाहन चालवण्याचा त्रास त्याला होऊ नये यासाठी स्वयंचलित कार निर्माण करायची आहे.

स्वयंचलित कार काय आहे?

स्वयंचलित, चालकरहित वा रोबोटिक असं म्हणू या हवं तर, गाडय़ा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्यात फीड करण्यात आलेल्या डेटाचा वापर करतात. थोडं अधिक सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या स्वयंचलित गाडीत, या मार्गावर कुठे कुठे पेट्रोल पंप आहेत, कुठे टोल नाके आहेत, कुठे तीव्र वळण आहे, या मार्गावरचे वातावरण कोणत्या ऋतूत कसे असते, मार्गावरची रहदारी, अडथळे, मार्गाचा डिजिटल नकाशा इत्यादी बारीकसारीक तपशील या गाडय़ांच्या यंत्रणेत फीड केलेला असतो. त्यानुसार सेन्सर्स आणि कॅमेरा यांच्या मदतीने या स्वयंचलित गाडय़ा त्यांचे कार्य पार पाडत असतात. स्वयंचलित गाडीचा पहिला प्रयोग १९८४ मध्ये पार पडला. परंतु तिचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयोग आता अलीकडेच झाला. मर्सडिीज बेन्झने यात आघाडी घेतली. त्यांनी एफ०१५ ही स्वयंचलित कन्सेप्ट कार २०१५ मध्ये लास वेगासमधील कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सादर केली. त्यानंतर टेस्ला, गुगल आणि फोक्सवॅगन यांच्यासह २७ कारनिर्मात्या कंपन्यांनी आता स्वयंचलित कार बनवण्यासाठी अमेरिकी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उबर कंपनीने स्वयंचलित कारचे तंत्रज्ञान विकसित करणारी ओट्टो ही कंपनी खरेदी केली आणि ऑक्टोबर महिन्यात कोलोरॅडोत एक कन्साइनमेंट पोहोचती करण्यासाठी स्वयंचलित ट्रकचा यशस्वी वापरही केला.

आरोप-प्रत्यारोप

गुगलची स्वयंचलित कार चाचण्यांमध्ये सपशेल आपटली. अ‍ॅरिझोनातील अपघातामुळे उबरच्याही स्वयंचलित कारवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. खरे तर हे तंत्रज्ञान अगदीच नवजात आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान मर्यादित स्वरूपात का होईना, कुठे तरी रुळायला हवे. तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र आहे. उबरने विकत घेतलेल्या ओट्टो या कंपनीवर गुगलच्या वेमो या स्वयंचलित कारच्या युनिटने खटला भरला आहे. कारण ओट्टोने त्यांचे लेझर बेस्ड रडार सिस्टीमचे डिझाइन चोरल्याचा आरोप आहे.