बजाज ऑटोची पल्सर ही दीडशे सीसीमधील यशस्वी मोटरसायकल आहे आणि या सेगमेंटमधील मोटरसायकलना मागणीदेखील आहे. कंपनीने पल्सरव्यतिरिक्त आणखी एक मोटरसायकल दीडशे सीसी सेगमेंटमध्ये गेल्या वर्षी लाँच केली. तसेच, आता ही मोटरसायकल आणखी एक व्हर्जनमध्ये म्हणजे १२५ सीसी पर्यायात उपलब्ध आहे. अन्य मोटरसायकलमध्ये असतात अशीच वैशिष्टय़े या मोटरसायकलमध्ये आहेत. मग, यामध्ये वेगळे काय आहे? ही मोटरसायकल सामान्य पोलादापासून नव्हे, तर एका विशिष्ट पोलादाचा अंश वापरून तयार करण्यात आली आहे. बजाज ऑटोने या मोटरसायकलचे नावही त्या नावावरून दिले आहे. देशाच्या सागरी संरक्षणासाठी वापरण्यात आलेल्या आयएनएस विक्रांत या पहिल्या जहाजाच्या पोलादाचा अंश या मोटरसायकलमध्ये वापरला आहे. त्यामुळेच मोटरसायकलचे नावही विक्रांत या नावाच्या इंग्रजी व्ही या आद्याक्षरावरून ठेवले आहे आणि त्याचे मार्केटिंगही कंपनीने तसेच केले आहे. त्यामुळेच या मोटरसायकलचे नाव कंपनीने व्ही १५० व व्ही १२५ असे ठेवले आहे. तसेच, इतरांपेक्षा वेगळी, अशी ओळख ठळकपणे दिसण्यासाठी पारंपरिक वा क्रूझर मोटरसायकल, नेकेड मोटरसायकलपेक्षाही वेगळा लुक व्ही मोटरसायकला कंपनीने दिला आहे. त्यामुळेच व्ही पाहिल्यावर आपल्याला क्रूझर, नेकेड स्ट्रीट, रेट्रो मोटरसायकलचा लुक मिळत असल्याचा आभास होते. म्हणजे, ही मोटरसायकल डिझाइनबाबत अन्य सगळ्या मोटरसायकलपेक्षा नक्कीच वेगळी आहे.

रायडरची पोझिशन आरामदायी करण्यासाठी थोडी खाली करण्यात आली आहे. त्यामुळे मोटरसायकल चालविताना आराम मिळतो. सेमी-डिजिटल इन्स्ट्रमेंटल कन्सोल दिला असून, मोटरसायकलच्या टाकीच्या झाकणाकडे पाहिल्यावर  आयएनएस विक्रांतचा अंश असल्याचा उल्लेख असलेला मोनोग्राम दिसतो आणि हीच या मोटरसायकलची खरी ओळख आहे. तसेच, व्ही हे अक्षर थ्रीडी स्टाइलमध्ये मोटरसायकलवर आहे. टेल लॅम्प छोटा असला तरी आकर्षक असून, तो एलईडीचा आहे. त्यास क्रोम फिनििशग देण्यात आले आहे. पिलन रायडरच्या सीटला काउल दिले असून, तो पर्याय म्हणून घेता येते. पण, यामुळे मोटरसायकलला एक रेट्रो लुकही मिळाला आहे. मोटरसायकलचा हेडलॅम्पही पारंपरिक पद्धतीमधील नाही. व्हीच्या दोन्ही व्हर्जनची रचना एकसारखी असली तरही थोडे फरक आहेत. मुख्य फरकम म्हणजे व्ही १५ ला १५० सीसीचे सिंगल सििलडरचे दोन व्हॅल्व्हचे एअर कूल्ड डीटीएसएसआयचे इंजिन असून, व्ही १२ ला १२५ सीसीचे इंजिन आहे. यातील १५० सीसी व्हर्नजला टय़ूबलेस टायर, डिस्क ब्रेक (केवळ पुढील चाक) दिला आहे.

मोटरसायकलला बसविण्यात आलेले इंजिन हे पूर्ण नवे असून, पॉवर, पिकअप चांगला आहे. तसेच, हायबरोबर सिटी हँडिलगसाठी व्ही चांगली आहे. मोटरसायकल दीडशे सीसी असल्याने मायलेज प्रति लिटर ५५ ते ६० किमी मिळू शकते. अर्थात, रस्त्यावरील वाहतूक, भौगोलिक स्थिती, चालविण्याची सवय यावरही मायलेज अवलंबून असल्याने ते कमीही मिळू शकते. दीडशे सीसी मोटरसायकलसाठी हे मायलेज चांगले आहे, असे म्हणायला हरकत नाही. ग्राहकांना नक्कीच नवे देण्याचा प्रयत्न बजाज ऑटोने केला आहे. अर्थात, प्रत्येकाचा मोटरसायकलच्या डिझाइनकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळे ही मोटरसायकल डिझाइन म्हणून किती अपील हा वैयक्तिक विषय आहे. पण, थोडा हटके लुक, आयएनएस विक्रांतचे अंश, दीडशे सीसी आणि रास्त किमतीस असणारी, अशी व्ही मोटरसायकल आहे.

obhide@gmail.com