मी थंडरबर्ड ३५० चालवते. चालवताना नावाप्रमाणेच रॉयल वाटतं. नेहमीप्रमाणे कामं करायला बुलेट वरून बाहेर पडले. मेन रोड क्रॉस करून पलीकडे जायचे होते आणि अचानक ट्रॅफिक थांबला, मी दुतर्फा बघितलं तर काय दोन्ही बाजूला बस थांबल्या होत्या आणि त्या मागे बऱ्याच गाडय़ाही थांबल्या, दोन्ही बसचे चालक मला खुणावून जा म्हणून सांगत होते. मी रस्ता क्रॉस करून थांबून त्यांना थॅक्स म्हणणार तेवढय़ात त्यांनी हसून हाताने टाटा करून ‘मस्त’ असं म्हटलंही, मी अवाक् झाले. असो तशीच पुढे बुलेटवरून जात असताना एका दुकानात काम होतं म्हणून गेले आणि तिथून बाहेर पडल्यावर एक मध्यमवयीन बाई, उच्चशिक्षित वाटत होती ती म्हणाली, ‘मॅडम तुम्हाला बघून खूप गर्व वाटतो, तुम्ही बुलेटवर बसल्यामुळे ती शानदार वाटते, माझे आशीर्वाद आहेत.’ असे एक ना दोन बरेच किस्से आहेत. रस्त्याने जाताना लोकांच्या नजरा एवढय़ा बोलक्या असतात की त्यात आश्चर्य, प्रश्न, कुतूहल, प्रेम आणि आपुलकीही जाणवते.

– निकिता रहाळकर

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
Ashok Chavan
“जो मै बोलता हूँ, वो मै..”, जाहीर सभेत अशोक चव्हाणांचा ‘रावडी’ अंदाज
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद