लॅम्बॉर्गिनी ह्य़ुराकॅन एलपी६१० स्पायडर हा लॅम्बॉर्गिनीचा नवा अवतार गुरुवारी मुंबईत सादर झाला. तब्बल तीन कोटी ८९ लाख रुपये किमतीच्या (एक्स शोरूम किंमत) या लॅम्बॉर्गिनीचा हा नवा अवतार कन्व्हर्टिबल स्वरूपाचा आहे. या गाडीची वैशिष्टय़े म्हणजे हिच्या एलईडी हेडलॅम्प्सना डब्ल्यूचा आकार देण्यात आला आहे. तसेच डेटाइम रनिंग एलईडी लाइट्सही आहेत. पुढील बम्परवर अधिक हवा आदळून गाडीत ती खेळती राहील अशा प्रकारे हिची रचना करण्यात आली आहे. तसेच रूफ मऊमुलायम आहे. ते हटवताही येते. ५० किमी प्रतितास या वेगात असताना हे रूफ निव्वळ १७ सेकंदात उघड-बंद करता येते. ह्य़ुराकॅन या सीरिजमधील सर्व वैशिष्टय़े लॅम्बॉर्गिनीच्या नव्या अवतारात समाविष्ट आहेत. विशेषत तिचा डॅशबोर्ड स्पायडर मालिकेतील इतर गाडय़ांसारखाच आहे. सेव्हन स्पीड डय़ुएल क्लच ट्रान्समिशनची शक्ती असलेले या गाडीचे इंजिन तेवढेच पॉवरफूल आहे. हिचे व्ही१० इंजिन अवघ्या साडेतीन सेकंदात १०० किमी प्रतितास एवढा वेग पकडू शकते. ह्य़ुराकॅन कन्व्हर्टिबलचा टॉप स्पीड ३२४ किमी प्रतितास एवढा प्रचंड आहे.