* मला चारचाकी शिकण्यासाठी घ्यायची आहे. माझे बजेट दोन लाख रुपये आहे. अल्टो किंवा व्ॉगन आर घ्यावी, असे वाटते. तुम्ही काय सुचवाल.

नितीन गोरे.

* होय, तुम्ही शिकण्यासाठी व्ॉगन आर किंवा आय१० घ्यावी. पाच वर्षे वापरलेल्या गाडय़ा तुम्हाला मिळू शकतील. परंतु तुम्ही गाडी शिकण्यासाठी घेणार असाल तर सीएनजी घेऊ नये.

* मी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये व्ॉगन आर एलएक्सआय सीएनजी गाडी घेतली. माझे दरमहा किमान १७५ किमी रनिंग होते. महिनाभरापूर्वी पुढील उजव्या बाजूच्या टायरमध्ये घुसलेली भलीमोठी पिन काढल्यानंतर पंक्चर झाले. पंक्चर काढल्यानंतर काहीजणांकडून टय़ूबलेस टायरसाठी पंक्चर सेलिएंट सोल्युशन मिळते, असे ऐकले. टायरची काळजी कशी घ्यावी, कृपया सांगा.

राजेश गाडे

* टय़ुबलेस टायरमध्ये सोल्युशन छोटय़ा बारिक पंक्चरसाठी नक्कीच उपयुक्त आहे. परंतु खिळे व पत्रे इत्यादींसारख्या मोठय़ा वस्तूंपुढे ते काहीच काम करत नाही. टायर वेळच्यावेळी बदलल्याने पंक्चर टळते.

* माझी क्वालिस गॅडोलिनियम ही गाडी मला मॉडिफाय करायची आहे. तिचे बार्बरिक टिकेट्स एॅव्हरेज आणि पिकअप साइडबार वाढवायचे आहेत. मी काय करू.

देवराज

* मी असा सल्ला देईन की, असे मॉडिफिकेशन करणे कायद्याने चुकीचे आहे. जुन्या गाडय़ा मॉडिफाय करण्यात नुकसान होते आणि पदरात काहीच पडत नाही.

* मला अल्टो-८०० या गाडीबद्दल माहिती द्या. मला ही गाडी घ्यायची आहे. माझे बजेट तीन-साडेतीन लाख रुपये आहे.

ऋतुजा तोटे, वर्धा.

* अल्टो-८०० ही गाडी आता सर्वात लहान गाडी झाली आहे. त्यापेक्षा तुम्ही त्याच किमतीत रेनॉ क्विड किंवा डॅटसन रेडी गो ही गाडी घ्यावी. ही गाडी तीन ते साडेतीन लाखांत ऑनरोड मिळू शकेल.

* मी प्रथमच गाडी खरेदी करणार आहे. माझे बजेट सहा ते सात लाख रुपये आहे. मी सरकारी नोकर आहे. त्यामुळे माझे मासिक रनिंग १५० ते २०० किमी असेल. सुटय़ांमध्ये मला लाँग ड्राइव्हला जायला आवडेल. मला नवीन होंडा अमेझ घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करा.

श्रीकांत तेलंगे

* मी तुम्हाला अमेझ खरेदी करण्याचा सल्ला देणार नाही. कारण ही आकाराने लहान आणि वजनाने हलकी गाडी आहे. तसेच त्यात तुम्हाला कम्फर्ट मिळणार नाही. होंडा जॅझ हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला डिझेल व्हेरिएंटमध्ये गाडी हवी असल्यास टाटा झेस्ट घेण्याचा सल्ला देईन.

* मला प्रिमियम हॅचबॅक किंवा कॉम्पॅक्ट एसयूव्ही घ्यायची आहे. माजे बजेट साडेबारा लाख रुपयांपर्यंत आहे. परंतु दररोजचे रनिंग ४०-५० किमी आहे. कम्फर्टेबल गाडी घेण्याला आमचे प्राधान्य आहे. तुम्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुचवणार असाल तर व्हिटारा ब्रेझा आणि फोर्ड इकोस्पोर्ट यांमध्ये कोणता पर्याय चांगला आहे. तुम्ही काय सुचवाल.

डॉ. सुचेता वळसंगकर, नाशिक

* मी तुम्हाला ह्य़ुंदाई क्रेटा घेण्याचा सल्ला देईन. कारण ही यंदाची सर्वोत्तम आणि कम्फर्र्टेबल एसयूव्ही आहे. ब्रेझा आणि इकोस्पोर्ट या गाडय़ा क्रेटापेक्षा थोडय़ा कमी कम्फर्र्टेबल आहेत. तुम्हाला चांगला मायलेज देणारी कार हवी असेल तर ब्रेझा हा चांगला पर्याय आहे. मात्र, ती सध्या तरी डिझेलमध्येच उपलब्ध आहे. परंतु इकोस्पोर्टच्या इकोबूस्टचे इंजिन टबरेचाज्र्ड आहे ज्याचा बीएचपी जास्त असून त्यामुळे ताकद आणि चांगला मायलेज मिळतो.

* मला सात आसनी गाडी घ्यायची आहे. डॅटसन गो प्लस ही गाडी कितीपर्यंत मिळेल. तिचा मेन्टेनन्स कसा आहे. ही गाडी योग्य नसेल तर मी दुसरी कोणती गाडी घेऊ.

अनंता मुकादम

* डॅटसन गो प्लस ही गाडी सात आसनी असली तरी तिच्यात पाच मोठी माणसेच बसू शकतात. तुम्ही कमीत कमी किमतीत उत्तम गाडी म्हणजे शेवरोले एन्जॉय ही गाडी घ्यावी.

या सदरासाठी प्रश्न पाठवाls.driveit@gmail.com