• मला सेकंड हॅण्ड सेडान कार घ्यायची आहे जी मेन्टेनन्स आणि मायलेजला चांगली असेल आणि खिशाला परवडू शकेल. मला होंडा सिटी घ्यावी असे वाटते परंतु तुम्ही तुमचे मत सांगा. मी जास्तीत जास्त आठवडय़ातून दोन किंवा तीनदा गाडी चालवणार आहे. सेडानच्या तुलनेत अन्य कोणती चांगली गाडी असेल तर कृपया सुचवा.

       – आशाकांत गोंडाणे, नागपूर

* सेकंड हॅण्ड सेडानमध्ये जास्तीत जास्त पाच वर्षे वापरलेली गाडी तुम्ही घेऊ शकता. त्यातही तुम्ही मारुती डिझायर आणि होंडा सिटी या दोन गाडय़ांचा पर्याय ठेवू शकता. आणि शक्यतो तुम्ही पेट्रोलवर चालणारी गाडीच घ्या.

More than average rainfall this year Know the weather forecast of monsoon rains
Monsoon Season Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस… जाणून घ्या मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच
  • माझे रोजचे ड्रायव्हिंग ३० किमी आहे. तसेच माझे बजेट दहा लाख रुपयांपर्यंत आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही मला जास्त आवडतात. ब्रेझा, बीआर व्ही आणि क्रेटा यांपैकी मी कोणती कार घेऊ, कृपया सांगा.

       – राजेंद्र म्हमाणे, सोलापूर

* डिझेलमध्ये नक्कीच व्हिटारा ब्रेझा ही चांगली गाडी आहे. परंतु पेट्रोल व्हर्जनमध्ये तुम्हाला क्रेटाच योग्य ठरेल. क्रेटापेक्षा अन्य कोणती गाडी हवी असेल तर तुम्ही फोर्ड इकोस्पोर्टचा विचार करावा. हिचे इकोबूस्ट इंजिन सर्वोत्तम आहे.

  • मी एक शिक्षक असून मला मारुतीची बलेनो ही गाडी खूप आवडते. माझा दरमहा ५०० किमीपेक्षा अधिक प्रवास होत नाही. मला डिझेलवर चालणारी गाडी घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

       – . आर. पाटील, शिरगाव बी

* तुमचे ड्रायव्हिंग जास्त नसेल तर डिझेलवर चालणारी गाडी घेऊ नका, खूप तोटा होईल. तुम्ही बलेनो घ्या परंतु पेट्रोल व्हर्जनच घ्या. तिची पॉवर आणि मायलेज उत्तम आहे. हायवेवर ती २० किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते.

  • होंडा मोबिलिओ, शेवरोले एन्जॉय आणि मारुती अर्टिगा यांच्यापैकी कोणता पर्याय उत्तम आहे. माझे महिन्यातून एकदा गावाला जाणे होत असते. साधारण २०० ते ३०० किमीचा प्रवास होतो. आमच्या कुटुंबात एकूण पाच सदस्य आहेत. तुम्ही कोणती गाडी सुचवाल?

मयूरेश खाडिलकर, सोलापूर

’ शेवरोलेची एन्जॉय ही गाडी सात-आठ माणसांसाठी अगदी आरामदायी आहे. अर्टिगाची किंमत जास्त आहे आणि ती पाच-सहा जणांसाठीच योग्य आहे; परंतु तुम्ही संख्येने कमी असाल तर व्हिटारा ब्रेझा किंवा होंडा जॅझ घ्यावी.

  • मला पेट्रोलवर चालणारी हॅचबॅक कार घ्यायची आहे. माझे बजेट साडेसात लाखांपर्यंत आहे. साधारणत: मासिक हजार ते बाराशे किमीपर्यंतचे ड्रायव्हिंग होईल. जॅझ, पोलो आणि आय२० एलिट या तिघींपैकी कोणती कार घ्यावी?

      – आनंद नालगुंडवार

* तुम्ही साडेसात लाख रुपयांची गुंतवणूक करतच आहात तर मी तुम्हाला बलेनो अ‍ॅटोमॅटिक कारचा पर्याय सुचवेन. हिचे सीव्हीटी ट्रान्स्मिशन खूपच परिणामकारक आहे. मात्र, तुम्हाला आणखी दणकट कार आणि जास्त प्रशस्त गाडी हवी असेल तर पोलो हा चांगला पर्याय आहे. तसेच लुक्स आणि स्पेस यांच्याबाबतीत जॅझला कोणीही स्पर्धक नाही. चॉइस इज युवर्स.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com