जगभरात एसएलकेला २०र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल झाल्याच्या अवघ्या ४ महिन्यांतच मर्सििडज-एएमजी एसएलसी ४३ भारतात लाँच करण्यात आली. मर्सििडज-एएमजी एसएलसी ४३ हे असे पहिलेच उत्पादन आहे, जे नव्या दोन आकडी शब्दावलीसह-४३ मध्ये सादर करण्यात आले आहे. ६६व्या तुरिन मोटर शोमध्ये मर्सििडज-बेंझने एसएलके (आर १७०) ही गाडी सादर केली होती आणि त्यातून सुरू झालं ओपन टॉप मोटिरगचं एक नवं पर्व. यातलं रूप डिझाइन इतर अनेक ओपन-टॉप वाहनांसाठी आदर्शवत ठरलं. व्ही ८ हे निसर्गापासून प्रेरित असणारे इंजिन आणि सििलडर शट-ऑफ ही वैशिष्टय़ असणाऱ्या एसएलके ५५ची जागा आता ३.० लिटर व्ही ६ बाय-टबरे इंजिनच्या एसएलसी ४३ ने घेतली आहे.

रेनॉ लॉजीची वर्ल्ड एडिशन

नवी दिल्ली : रेनॉच्या क्विड आणि न्यू डस्टर रेंज या यंदा लाँच झालेल्या गाडय़ांना चांगला प्रतिसाद लाभला. या दोन्ही गाडय़ांच्या यशानंतर आता रेनॉने लॉजी या त्यांच्या एमपीव्हीची वर्ल्ड एडिशन दाखल केली आहे. नुकतेच दिल्लीत तिचे अनावरण झाले. रेनॉचे हे नवे उत्पादन म्हणजे ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आवडीनिवडीनुसार समकालीन उत्पादने दाखल करण्याच्या आश्वासनपूर्तीचा भाग आहे. नवी लॉजी इंधनस्नेही तर आहेच, शिवाय आतून प्रशस्त जागा, सुरक्षितता, चांगला लुक याहीबाबतीत आता इतरांच्या तुलनेत अधिक आकर्षक झाली आहे. नव्या लॉजीच्या वर्ल्ड एडिशनच्या बाह्यरूपात आणि अंतरंगात एकूण २५ नव्या वैशिष्टय़ांची भर घालण्यात आली आहे. ८५ पीएस आणि ११०पीएस अशा दोन व्हेरिएन्ट्समध्ये उपलब्ध असलेल्या नव्य वर्ल्ड एडिशनची किंमत अनुक्रमे नऊ लाख ७४ हजार आणि दहा लाख ४०हजार रुपये आहे.