बाइक चालविण्याचे वेड हे मला लहानपणापासून आहे पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे कॉलेजला मी बाइक घेऊन जात असे जारकरवाडी माझे गाव घर ते कॉलेज १५ कि.मी. अंतर असल्यामुळे पहाटे जाण्यासाठी एस. टी.लाही तुडुंब गर्दी असे म्हणून वडिलांनी मला त्या वेळी मला बजाज ४२ ही बाइक घेऊन दिली होती. लग्नानंतर मुंबई आल्यावर माझे बाइकवेड बघून माझ्या मिस्टरांनी मला प्रथम होंडाची करिझ्मा आणि नंतर आता बुलेट घेऊन दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या बहुतेक बाइक मी चालविल्या आहेत पण बुलेट चालविण्याचा थाटच निराळा मुळात खूप कमी स्त्रिया बाइक चालवितात पण बुलेटचा आवाज आणि चालविणारी स्त्री बघताच लोक आश्चर्यचकित होतात तशी बुलेट वजनदार बाइक आहे, पण ती चालविल्यानंतर दुसरी बाइक रायडिंगला मजाच येत नाही.

नवीन बुलेट घेतल्यावर रायडिंग करताना एकदा चालू होत नव्हती तेव्हा मला कळले इंजिन बंद आणि सुरू करण्यासाठी बटण आहे तर टाकीतील पेट्रोल दाखविण्याचा काटा बुलेटला नाही त्यामुळे पेट्रोल संपल्यावर धक्का मारत पंपावर न्यावी लागली. बुलेट चालवीत असल्यामुळे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो लोकांना तुम्ही आक्रमक आणि डेरिंगबाज वाटता आणि समाजात तुमची ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण होते.

ॅड. रूपाली सचिन दाते

‘सराट’ चित्रपटातील आर्ची बुलेटवर स्वार होऊन दिमाखात कॉलेजात येते त्या वेळी सर्वाच्याच आश्चर्यचकित नजरा तिच्याकडे वळतात. अगदी अस्संच होतं, जेव्हा एखादी मुलगी बुलेट चालवते त्या वेळी. तुमच्याही बाबतीत असेच घडले असेल नाही? तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करायचाय. बुलेट चालवणाऱ्या महिलांना या पानावर प्रसिद्धी दिली जाणार आहे. तुम्ही फक्त तुमचा बुलेटवरचा फोटो आणि तुमचा अनुभव १०० शब्दांत आमच्याकडे पाठवायचा.

आमचा पत्ता.. ls.driveit@gmail.com