दूरचित्रवाणी आणि मनोरंजन उद्योग हा खूप मोठा आहे. येथे एका रात्रीत तुम्ही स्टार होता आणि एकाच रात्री खूप काही गमावताही. पण या मंचावर एखादा टीव्ही शो करायचा असेल तर भन्नाटच! आणि तो जर यशस्वी करायचा असेल तर चांगल्या सादरीकरणाबरोबरच तुम्ही मांडत असलेल्या विषयाचे ज्ञान हवेच. कुठला शो यशस्वी होईल अथवा नाही हे कसे ठरवू शकाल? अगदीच आकडय़ात सांगायचं झालं तर असा शो हा विविध २०० देशांमध्ये दिसायला हवा आणि त्याचे ३५ कोटींहून अधिक दर्शक हवेत.

पण, मी हे इथं टीव्ही शोबद्दल का बोलतोय?

कारण जगातील उत्कृष्ट दूरचित्रवाणी कार्यक्रम हा कार शो आहे. हो. तुम्हाला त्याचं नाव माहितीय?

टॉप गीअर शोचा मी खूपच चाहता आहे. माझ्यासारखे अनेक कोटय़वधीही त्याचे आवडते असतीलच. बरं, यामध्ये केवळ पुरुषच तर महिला दर्शकांचे प्रमाणही उल्लेखनीय आहे. ४० टक्के महिला या शोच्या दर्शक आहेत.

या शोचे सादरीकरण तर उत्तमच; परंतु त्यातील मजकूरही माहितीपूर्ण असतो. या शोमधील जेर्मी क्लार्कसन, रिचर्ड हॅमंड आणि जेम्स मे या तिघांची केमेस्ट्री तर बघायलाच नको. ऑटोमोबाइल जर्नेलिजम जगतातील हे तिघे सुपरस्टारच. या शोचे सादरकर्ते नव्या वाहनांची चाचणी बोलिव्हिअन जंगलात घेतात.

बीबीसीसाठी हा शो तर खूपच नफ्याचाही आहे. एकटा टॉप गेअर शो १.५ अब्ज डॉलर उत्पन्न मिळवून देतो. म्हणून मी या शोला दूरचित्रवाणी जगतातील यश मानतो.

गेल्या काही वर्षांमध्ये या शोदरम्यान काही अनुचित घटना घडल्या. येथे एकदा आगही लागली आणि सादरकर्त्यांना या शोमधूनच बाहेर पडावे लागले. चाहते या शोसाठी मुकले. आता हे तिघेही असाच शो अन्य वाहिनीवर करण्यासाठी मोकळे आहेत. त्यांच्यासाठी अनेक आघाडीच्या कंपन्या जाहिरातीसाठी उत्सुक आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ते सारे परतत आहेत. या नव्या शोचे नाव आहे द ग्रॅण्ड टूर. त्यासाठी माझ्यासह असंख्य जण उत्सुक आहेतच.

अमेझॉन प्राइमने या शोसाठी तीन वर्षांचा करार केला आहे. २६ कोटी डॉलरच्या या रकमेसाठी हे तिघेही बांधील आहेत. म्हणजेच प्रत्येक ६० मिनिटांच्या भागाकरिता ६० लाख डॉलर किंवा आजच्या भारतीय चलनात ४० कोटी रुपये अशी ही रक्कम होते. तेव्हा हा जागतिक ग्रेट शो चुकवू नका..

pranavsonone@gmail.com