मर्सडिीज बेन्झने नुकतेच पुण्यानजीक चाकण येथे रिटेल प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले. तसेच सर्वात मोठे पार्ट्स वेअरहाऊसिंगचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले. वेअरहाऊस तब्बल १६ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे असून त्यात मर्सडिीजचे ४४ हजार स्पेअर पार्ट्स साठवून ठेवण्याची क्षमता आहे. या वेअरहाऊसमुळे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेत वाढ तर होणार आहेच, शिवाय ग्राहकांना सुटे भाग सहजपणे उपलब्ध होणार आहेत. मर्सडिीज बेन्झच्या प्रशिक्षण केंद्रही वैशिष्टय़पूर्ण असेच

आहे. आशियातील सर्वात भव्य असे हे प्रशिक्षण केंद्र असून त्यात एकाच वेळी २५५ जणांना प्रशिक्षण देता येणार आहे.  १५ हून अधिक वर्गखोल्या आणि तितक्याच वाहनांची संख्या असणारे हे केंद्र म्हणजे मर्सडिीज ब्रॅण्डचा भारतीय बाजारपेठेसाठीचा अत्यंत महत्त्वपूर्ण विस्तार असेल. तसेच कार मॉडिफिकेशन सेंटरही सुरू करण्यात आले आहे. त्यात एएमजी स्टायिलग, डिकॅल किट्स, खास कार अपहोल्स्ट्री, खास रंग, मागच्या आसनांसाठीच्या एन्टरटेन्मेंट सिस्टीम बसवणे, एल्युमिनेटेड स्टार, डायमंड ग्रील, क्रोम प्लेट्स, अलॉय व्हील्स बसवणे या मूल्यवíधत सेवा देण्यासाठीही हे केंद्र उभारण्यात आले आहे. पार्ट्स वेअरहाऊस आणि मर्सडिीज बेन्झ अकॅडमीचे उद्घाटन डॅम्लर एजीमधील मर्सडिीज बेन्झचे ओव्हरसीज विभागाचे प्रमुख डॉ. टिल कॉनराड आणि मर्सडिीज बेन्झ इंडियाचे एमडी रोलॅण्ड फॉल्गर यांनी केले.