एकूणच आपल्याकडे स्कूटरना मागणी वाढत आहे. यामध्ये महिला, पुरुष ग्राहकांचा समावेश असला तरी शहरातील तरुण ग्राहकही स्कूटर घेण्यास प्राधान्य देऊ लागला आहे. त्यामुळेच स्कूटरही आता डिझाईन आणि फीचरबाबत स्मार्ट होऊ लागल्या आहेत. डिजिटल कन्सोल, ऑटो हेड लॅम्प ऑन, डिस्कब्रेक, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम, डिझायिनग यामध्ये सुधारणा होत आहे. आतापर्यंत आपल्याकडे ११० ते १२५ सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटरना सर्वाधिक मागणी आहे. आता दीडशे सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटरना मागणी येऊ लागली आहे. त्यामुळेच कंपन्याही अशा स्कूटर बाजारपेठेत आहेत. सध्याच्या स्कूटर या कम्युटर सेगमेंटमधील सर्वाधिक आहेत. व्हेस्पा ही स्कूटर लाइफ स्टाइल स्कूटर म्हणता येईल, कारण याची किंमतही प्रीमियम आहे. स्टाइल वेगळी असूनही अप्रिला एसआर १५० गेल्या वर्षी भारतात लाँच झाली. पाहता क्षणी स्कूटर वेगळ्या स्टाइलची असल्याचे दिसते. त्यामुळे आपले लक्षही या स्कूटरकडे जाते. सेमी स्पोर्ट्स डिझाईनची स्कूटर ही नक्कीच डिझाईन म्हणून अपििलग आहे. तसेच, मोटरसायकलसारखी पॉवर मिळण्यासाठी यास ११.५ पीएसचे १५० सीसीचे इंजिन बसविले आहे. सीव्हीटी प्रकारातील हे इंजिन पिकअप घेण्यास थोडा वेळ लागतो. मात्र, एकदा पिकअप घेतल्यावर इंजिन कामगिरी उत्तम असल्याचे जाणवते.

एकूणच अप्रिलाचे डिझाईन नव्या युगाचे असून, युरोपीय बाजारपेठेत असलेल्या मोटोस्कूटरसारखाच डिझायिनग अपील आहे. त्यामुळेच स्कूटरला १४ इंचाचे मॅगव्हीलचे चाक देण्यात आल्याने उंचीही आहे. मोठय़ा चाकांचे फायदे अनेक असतात. टायरची रचना ही मोटरसायकलच्या चाकांसारखी आहे. त्यामुळेच अन्य स्कूटरच्या तुलनेत रस्त्यावर विशेषत: चांगली ग्रिप मिळत असल्याचे जाणवते. मोटरसायकलप्रमाणेच अप्रिला एसआर १५० ला टेलिस्कोपिक सस्पेन्शन देण्यात आले आहे. तसेच, मागील बाजूस सिंगिस्प्रग सस्पेन्शन आहे. टेलिस्कोपिक सस्पेन्शन चांगले आहे. मात्र, मागील सस्पेन्शनमध्ये सुधारणेस वाव आहे. असे असले तरी अन्य स्कूटरच्या तुलनेत अप्रिला एसआर १५० चे सस्पेन्शन चांगले आहे. मोटरसायकलप्रेमी असलेल्यांना मात्र ट्रॅफिकमुळे शहरात वा वीकेंडला शॉर्ट डिस्टन्स रायिडग करणाऱ्यांसाठी ही स्कूटर चांगला पर्याय आहे, कारण पॉवर, पिकअक चांगले असून चाके मोठी असल्याने ग्रिप उत्तम आहे. तसेच याचे रायडर पोझिशिनगही आरामदायी आहे. तसेच, मागे बसणाऱ्यालाही आराम मिळेल, अशा पद्धतीने रचना केली आहे. दीडशे सीसी स्कूटर असली तरीही प्रति लिटर ३५-४० किमी मायलेज मिळू शकते.

सध्या भारतीय बाजारपेठेत अप्रिला एसआर १५० ला स्पर्धक ठरेल, अशी ऑटोमॅटिक स्कूटर नाही. होंडाची अ‍ॅक्टिव्हा १२५, सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ या स्कूटरशी सीसीबाबत तुलना करता येईल. मात्र, डिझाईन, पिकअप, पॉवर याबाबतीत या स्कूटर अप्रिला एसआर १५० च्या तुलनेत मागे आहेत. रेसिंग इन्स्पायर्ड मोटोस्कूटरचा लुक, पॉवर आवडणाऱ्यांसाठी सध्या अप्रिला एसआर १५० ही एकमेव स्कूटर आहे. भारतात ही स्कूटर तयार होत असल्याचे तसेच सत्तर टक्क्यांहून अधिक सुटय़ा भागांची निर्मिती स्थानिक बाजारपेठेत होत असल्याने स्कूटरची किंमतही रास्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच डिझाईन, पॉवर, कम्फर्ट, किंमत याबाबतीत ही स्कूटर आकर्षक वाटते. रेसिंग स्टाइल स्कूटर आवडणाऱ्यांनी वा नवा अनुभव घेण्याची तयारी असणाऱ्यांनी स्कूटर घेताना या स्कूटरची टेस्ट राइड घेऊन आपण कोणती स्कूटर घ्यायची याचा निर्णय घ्यायला हरकत नाही.

obhide@gmail.com