आपल्याकडच्या रस्त्यांची दुरवस्था पाहता ऑफ रोड ड्रायिव्हगचा वेगळा अनुभव घ्यावा, असे कोणाला वाटणार नाही. मात्र ऑफ रोड ड्रायिव्हगची खुमारी, त्याचा थरार एकदा तरी अनुभवावाच असे सच्चा कारप्रेमीला वाटतच असते. कारण त्यामुळे होतं काय की, ड्रायिव्हगचं कौशल्य तर किंचित सुधारतंही आणि आत्मविश्वासही दुणावतो, शिवाय रस्त्यावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमधून गाडी नेताना फारसं काही वाटतही नाही..

मिहद्राच्या थार या गाडीच्या टेस्ट ड्राइव्हच्या निमित्ताने नुकताच हा ऑफ रोड ड्रायिव्हगचा अनुभव मिळाला. मी काही निष्णात ऑफ रोडर नाही. त्यामुळेच जरा भीती आणि उत्सुकता अशा संमिश्र भावनेतूनच मिहद्रा अ‍ॅडव्हेंचरच्या ट्रेल सव्‍‌र्हायवर ट्रेिनग प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी नावनोंदणी केली आणि गेल्याच आठवडय़ात त्यांच्या इगतपुरीतल्या ऑफ रोड ट्रेिनग अ‍ॅकॅडमीत हा थरार अनुभवला. तब्बल २८ एकरावर पसरलेल्या मिहद्राच्या ऑफ रोड ट्रॅकवर आम्ही तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली दोन दिवस थार सीआरडीई या अस्सल जीपमधून ऑफ रोिडग करीत होतो. फोर व्हील ड्राइव्ह सिस्टीम असलेल्या या थार ऑफ रोड ड्रायिव्हग प्रोग्राममध्ये चार टप्प्यांचा समावेश होता. पहिले सत्र फोर व्हील ड्राइव्ह थिअरीवर होते. यात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असेल, असा आमचा अंदाज होता. मात्र, आयोजकांनी तो खोटा ठरवीत थेट आम्हाला फोर व्हील ड्राइव्ह असलेल्या थारमध्येच बसवले. त्यानंतर आम्हाला फोर व्हील ड्राइव्ह थारची वैशिष्टय़े, त्याची संपूर्ण माहिती वगरे देण्यात आली आणि त्याचबरोबर हेल्मेट परिधान करण्यास सांगितले. आणि सुरू झाला, आमचा पहिल्या दिवसाचा ऑफ रोड ड्रायिव्हगचा थरार..

  • होम रन

या प्रवासातला पहिला टप्पा होता होम रन. या टप्प्यात एका अरुंद रस्त्यावरून जीप चालवून ती एका विशिष्ट आकाराच्या टेकाडावरून खाली उतरवायची आणि पुन्हा त्याच अरुंद जागेवर रिव्हर्स करून पुन्हा स्टार्ट पॉइंटला आणण्याचे आव्हान आमच्यापुढे ठेवण्यात आले. सुरुवात अर्थातच आमचे प्रशिक्षक मनीष यांनी केली. मी ड्राइव्ह करीत असताना जीप पूर्णपणे एका बाजूला कलली. आता हे धूड पडणारच अशी भीतीही एका क्षणी मनात येऊन गेली. मात्र, प्रशिक्षक मनीष यांनी धीर दिला. त्यांनी दिलेल्या सूचनेबरहुकूम मी हा टप्पा व्यवस्थित पार पाडला. या पहिल्या टप्प्यातच आम्हाला गाडीत बसताना हेल्मेट का देण्यात आले, याचे महत्त्व पटले.

  • झिग झ्ॉग हिल

दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही पुन्हा इगतपुरीत आलो. आणि तिसरा टप्पा, झिग झ्ॉग हिल, सुरू केला. यात एक गंमत होती. उंच टेकडीवर जायचे, पुन्हा खाली उतरायचे, पुन्हा वर जायचे.. आल्यापावली परत यायचे आणि पुन्हा रिव्हर्स असा हा खेळ होता. संपूर्ण रस्ता अर्थातच निसरडा होता. त्यामुळे गाडीचे टायरसारखे स्लिप होऊन गाडी नियंत्रणात ठेवण्यात अडचण उद्भवत होती. तसेच या टू व्हील ड्राइव्ह आणि फोर व्हील ड्राइव्ह यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी म्हणूनही या ट्रॅकचा वापर केला जातो. आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला प्रथम टू व्हील ड्राइव्ह गाडीत बसून हा टप्पा पार करण्यास सांगितले. मात्र, त्यात अनंत अडचणी आल्या. त्यानंतर आम्हाला याच ट्रॅकवर फोर व्हील ड्राइव्ह गाडीतून प्रवास करण्यास सांगितले. हा प्रवास अर्थातच बराच सुखकारक होता.

  • पॉण्ड रश

या टप्प्यात तुम्हाला एका उतारावरून गाडी चालवत ती पाण्याने भरलेल्या एका मोठय़ा खड्डावजा तळ्यात उतरवावी लागते. या चिखलयुक्त पाण्यातून गाडी वर काढायची आणि त्यानंतर एका चढावावर गाडी चढवून पुन्हा आपल्या स्टार्ट पॉइंटला आणावी लागते. या टप्प्यात स्टीअिरग आणि अ‍ॅक्सिलरेशन यांवर तुमचे नियंत्रण असणे अपेक्षित असते. या दोन गोष्टी तुम्ही जर नीट हाताळल्या तर हा टप्पा सहज पार होतो. हे लिहायला सोपे असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. आमचे डेमॉन्स्ट्रेटर संजीव यांची गाडी त्या छोटय़ा तळ्यात अडकली. निघता निघेना त्यातून ती. मग तिला खेचून बाहेर काढावी लागली आणि आम्हाला रेस्क्यू ऑपरेशनचे प्रात्यक्षिक ‘याची देही याचि डोळा’ पाहायला मिळाले. संजीव यांनी त्यांचा ट्रॅक पूर्ण केल्यानंतर आमची पाळी होती. माझ्या तर पोटात गोळाच आला होता. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु मी हा टप्पा व्यवस्थित पूर्ण केला. त्याला अर्थातच आमच्या प्रशिक्षकांची साथ होतीच. पहिल्या दिवसाचे हे ट्रेिनग सायंकाळी उशिरापर्यंत लांबले. त्यामुळे उर्वरित टप्पे अर्थातच दुसऱ्या दिवशी पूर्ण करायचे ठरवून आम्ही नाशिककडे परतलो.

  • बोनयार्ड

या टप्प्यातील मार्गावर अनंत खड्डे आणि खडी होती. ज्यामुळे तुमच्या गाडीचे नुकसान होण्याची १०० टक्के गॅरंटी होती. आमच्या प्रशिक्षकाने आम्हाला सांगितलेही की, या अडथळ्यांना पार करून गेलेल्या गाडय़ांचे काही तुटलेले भाग तुम्हाला या टप्प्यात दिसतील. झालेही तसेच मात्र एका अर्थी हा टप्पा तसा काही विशेष आव्हानात्मक नव्हता. त्यामुळे तो नीट पार करता आला.

  • ब्लाइंड झोन

सर्वात आव्हानात्मक आणि धोकादायक असा हा टप्पा होता. ४५ अंशांचा तीव्र चढाव चढून तो उतरायचा, असे आव्हान होते. गाडी या चढावावर चढत असताना समोर फक्त निळे आकाशच होते. गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवून हा चढ चढायचा आणि तेवढय़ाच सावकाशपणे तो उतरायचा होता. हाही टप्पा संपला.

  • स्लश पिट

चिखलाने माखलेल्या खड्डय़ांतून थार चालवायची. एका चढावावरून दुसऱ्या चढावावर जाताना मध्ये हे खड्डे होते. त्यातून गाडी चालवायची असे या टप्प्यात होते. टेकाडावरून खाली पाहिले की छातीत धस्स व्हायचे. या तीव्र चढावावरून खाली गाडी न्यायची आणि पुन्हा तोच खेळ करायचा या विचाराने थोडी भीती वाटली. परंतु आतापर्यंतच्या टप्प्यांनी धीर चेपला होता. त्यामुळे हा टप्पाही पार पडला आणि आमचा दोन दिवसांचा ऑफ रोड ड्रायिव्हगचा प्रवास सुफळ संपूर्ण झाला. हा संपूर्ण ऑफ रोड ड्रायिव्हग एक्स्पिरिअन्स निर्वघ्निपणे पार पडण्यात अर्थातच मिहद्राच्या टीमचा हातभार मोठा आहे. या कोर्समध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या सुरक्षेची काळजी त्यांनी वाहिली. शिवाय कोणाला काही दुखापत झालीच तर त्यांच्याकडे वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होत्या.

ऑफ रोडचे उपलब्ध कोर्स

  • गेटिंग डर्टी कोर्स – कालावधी – पाच तास,
  • शुल्क – सहा हजार रुपये

यात सहभागी होणाऱ्याला फोर व्हील ड्राइव्ह ही संकल्पना सांगितली जाते. हा एक प्रकारे इंट्रोडक्टरी कोर्स आहे. यात ऑफ रोड टेक्निक्सची माहिती करून दिली जाते. शिवाय तुमच्या शंकांचे समाधान करणारे प्रश्नोत्तराचे सत्रही यात असते. तसेच ऑफ रोड ड्रायिव्हगचा छोटासा कोर्सही केला जातो. प्रमाणपत्र दिले जाते.

  • ट्रेल सव्‍‌र्हायवर कोर्स – कालावधी – दहा तास

हा दोन दिवसांचा कोर्स असून याचे शुल्क १५ हजार रुपये आहे.

वरील सर्व टप्पे या कोर्समध्ये अनुभवायला मिळतात.

थारचा परिचय

मिहद्राने २०१० मध्ये थारची निर्मिती केली. मात्र, आता त्यात अनेक बदल करून नव्याने ती सादर करण्यात आली आहे. २५०० सीसी इंजिन क्षमता असलेल्या थारचे इंजिन दणकट आहे. सहा आसनी या गाडीतील अंतर्गत रचनाही सुखावह आहे. डिझेल मॉडेल असलेल्या थार सीआरडीईची किंमत सव्वाआठ लाख रुपये आहे तर डीआय श्रेणीतील थार सव्वापाच लाखांपासून सुरू होते तर फोर व्हील ड्राइव्ह मॉडेल सहा लाखांपर्यंत उपलब्ध आहे.