सरलेले २०१५-१६ आर्थिक वर्ष जवळपास सर्वच देशी-विदेशी प्रवासी वाहनांच्या निर्मात्यांसाठी फलदायी ठरले. विशेषत: आधीच्या दोन वर्षांतील नकारात्मक वाढीच्या पाश्र्वभूमीवर ही वाढ सुखद ठरली. देशातील सर्वात मोठय़ा कार उत्पादक मारुती सुझुकीने तर आर्थिक वर्षांला सर्वाधिक १०.६ टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीने निरोप दिला. सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने सुमारे १४ लाख वाहनांची विक्री केली. विशेषत: एस क्रॉस, बलेनो आणि महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या व्हिटारा ब्रेझा या नव्या प्रस्तुतींतून मारुतीने सरलेल्या आर्थिक वर्षांत एकूण १४,२९,२४८ वाहनांच्या विक्रीचा विक्रमी आकडा गाठला. लक्षणीय बाब म्हणजे देशांतर्गत एकूण वाहन उद्योगाच्या विक्रीतील वाढीचा दर केवळ ७ टक्के असताना मारुतीने ११.५ टक्क्यांची वाढ साधली. बरोबरीने निर्यातीतील वाढीनेही एकूण वार्षिक वृद्धीमुळे मारुतीला दोन अंकी पातळी गाठता आली आहे.
सरलेले २०१५-१६ आíथक वर्ष जवळपास सर्वच देशी-विदेशी प्रवासी वाहनांच्या निर्मात्यांसाठी फलदायी ठरले. विशेषत: आधीच्या दोन वर्षांतील नकारात्मक वाढीच्या पाश्र्वभूमीवर ही वाढ सुखद ठरली. देशातील सर्वात मोठय़ा कार उत्पादक मारुती सुझुकीने तर आर्थिक वर्षांला सर्वाधिक १०.६ टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीने निरोप दिला. सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने सुमारे १४ लाख वाहनांची विक्री केली.