सध्या सुट्टय़ांचे दिवस आहेत. सुट्टीत कुठे फिरायला जायचे याचे आधीच प्लॅिनग झाले असेल. सुट्टीत पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेकांचा ओढा ही गर्दी टाळण्याकडेच असतो. मात्र तसे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. प्रत्येक जण त्यावर काही ना काही तरी पर्याय शोधतच असतो. त्यातून मग स्वतची गाडी काढून फिरायला जाण्याच्या कल्पना पुढे येतात. त्यातही गाडी लहान असेल तर मग थोडी अडचण होते; परंतु मनसोक्त फिरता तर येते. मोठी गाडी, म्हणजे एसयूव्ही वा एमपीव्ही, असेल तर मग काही बघायलाच नको. किमान सात-आठ जण आरामात बसू शकतात, शिवाय सामानसुमान ठेवण्यासाठीही अशा गाडय़ांमध्ये भरपूर जागा असते. लांबच्या प्रवासासाठी अशा गाडय़ाच जास्त उपयुक्त ठरतात. टोयोटा इनोव्हा ही त्यातल्या त्यात सर्वात लोकप्रिय गाडी. मात्र तिलाही उत्तम पर्याय ठरू शकतील अशा गाडय़ा सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यातलीच एक म्हणजे रेनॉ लॉजी. सात ते आठ जण आरामात बसू शकतील, अशा क्षमतेची लॉजी ही काही नव्यानेच बाजारात दाखल झालेली नाही; परंतु तिने इनोव्हापुढे एक उत्तम पर्याय उभा केलाय.

फ्रेंच कारमेकर असलेल्या रेनॉने एमपीव्ही सेगमेंटमध्ये लॉजी एमपीव्ही हे मॉडेल लाँच केले. त्याचीच आता प्रीमियम स्टेपवे ही नवी आवृत्ती बाजारात दाखल झाली आहे. लॉजी प्रीमियम स्टेपवे आधीच्या लॉजीच्या तुलनेत अनेक विस्तारित फीचर्स आहेत. हिचे बा’ारूपही आगळे असून अंतरंग तर आमूलाग्र बदलले आहे.

अंतरंग

लॉजीच्या बारूप आणि अंतरंगात १६ नवीन फीचर्सची भर घालण्यात आली आहे. तसेच हिला १६ इंचांचे धातूचे अलॉय व्हील्स जोडण्यात आल्याने लॉजी प्रीमियम स्टेपवेच्या सौंदर्यात भरच पडते. स्टेपवेचे अंतरंग स्टँडर्ड लॉजीच्या तुलनेत कमी-अधिक प्रमाणात सारखेच वाटते. यातही सात ते आठ आसनी, असा पर्याय उपलब्ध आहे. ड्रायव्हरचे सीट अत्यंत आकर्षक आहे, शिवाय या सीटवर बसणाऱ्याला आरामदायी वाटेल अशी त्याची रचना करण्यात आली आहे. चालकाला समोर तसेच आजूबाजूचे उत्तमरीत्या दिसू शकेल, अशी ड्रायव्हर सीटची रचना आहे. तब्बल आठ प्रकारे ही सीट अ‍ॅडजस्ट करता येते. तसेच स्टेपवेच्या खिडक्याही मोठय़ा आणि प्रशस्त आहेत. आतली सीटची रचनाही आरामदायी आहे. फक्त तिसऱ्या रांगेत बसणाऱ्यांच्या पायांना थोडा त्रास जाणवण्याची शक्यता जास्त आहे. परंतु असे असले तरी मारुती अर्टगिापेक्षा नक्कीच लॉजीतील आसनांची तिसरी रांग आरामदायी वाटते. आसनांच्या तीन रांगांपकी पहिली रांग वगळता दोन्ही रांगा अ‍ॅडजस्टेबल प्रकारात मोडतात. म्हणजे असे बघा, तुम्ही फार जण नाही आहात प्रवास करणारे, परंतु तुमच्याकडे सामानसुमान भरपूर आहे, तर तुम्ही मागच्या दोन रांगांमधील सीट बाजूला करून सामानासाठी जागा करू शकता. किंवा दुसऱ्या रांगेतील सीट थोडे फोल्ड करू शकता. त्याचे प्रमाण ६०:४० असे आहे. तिसऱ्या रांगेतील सीट तुम्ही घडी करून बाजूला सरकवून ठेवू शकता. त्यामुळे गाडीचा बूट स्पेसही (७५९ लिटर) वाढतो. गाडीतील आणखी एक उल्लेखनीय फीचर म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या रांगेतील वातानुकूलन सेवा. मागे एसीची हवा खेळती राहील अशी रचना करण्यात आली आहे. एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल ओआरव्हीएमएस, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, कीलेस एन्ट्री, हेडलाइट टर्न ऑन रिमाइंडर, गिअर शिफ्ट इंडिकेटर आणि १२ व्होल्टचे चार्जिग सॉकेट या सुविधा लॉजीमध्ये आहेतच. चाìजग सॉकेट्स तीनही रांगांसाठी उपलब्ध आहेत.

दणकट इंजिन

लॉजी स्टेपवे पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्यात आरएक्सएल ८५ पीएस आणि ११० पीएस व आरएक्सझेड ८५ पीएस आणि ११० पीएस (सात व आठ आसनी पर्यायांत उपलब्ध) रेनॉ डस्टरचे इंजिन लॉजी स्टेपवेला जोडण्यात आल्याने गाडीचे इंजिन दणकट आहे. डिझेल व्हेरिएंटमध्ये तर आणखी शक्तिशाली इंजिन आहे. त्यामुळे डिझेल व्हेरिएंटच्या लॉजीचा आरपीएम १७५० आहे. या गाडीचा मायलेज २० किमी प्रतिलिटर आहे तर पेट्रोल व्हेरिएंटचा मायलेज २१ किमी प्रतिलिटर एवढा आहे. सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअर यात आहेत.

या रंगांमध्ये उपलब्ध

पर्ल व्हाइट, मूनलाइट सिल्व्हर, प्लॅनेट ग्रे, रॉयल ऑíचड, स्लेट ग्रे आणि फिअरी रेड

खास वैशिष्टय़े

उत्तम हायवे परफॉर्मन्स, इंधनस्नेही आणि ताकदवान इंजिन

मॉडेल आणि किंमत

  • आरएक्सएल ८५ पीएस (८ आसनी)

– दहा लाख १३ हजार

  • आरएक्सएल ११० पीएस (८ आसनी)

– दहा लाख ८८ हजार

  • आरएक्सझेड ८५ पीएस (८ आसनी)

– दहा लाख 96 हजार

  • आरएक्सझेड ११० पीएस (८ आसनी)

– ११ लाख ७५ हजार

  • आरएक्सझेड ११० पीएस (७ आसनी)

– १२ लाख ०५ हजार (सर्व किमती एक्स-शोरूम, मुंबई आहेत.)

चालवण्याचा अनुभव

एकंदरच लॉजी ही उत्तम कार आहे. परंतु जेव्हा तुम्ही ड्रायिव्हग सीटवर बसता त्या वेळी खरा अंदाज येतो. सहा गिअर असूनही गाडी लवकर वेग घेत नसल्याचे गाडी चालवताना निदर्शनास आले. तसेच गिअर शििफ्टगही जरा कठीण वाटले. स्टीअिरग जड असून गाडी कमी वेगात असते त्या वेळी ते प्रकर्षांने जाणवते. मात्र, गाडी वेगात आली की स्टीअिरग हलके वाटते. गाडी सामानाचे वजन व्यवस्थित पेलू शकते. ब्रेकिंग सिस्टीमही उत्तम आहे.

सुरक्षा

एबीएस आणि ईबीडी, ब्रेक असिस्ट, फ्रण्ट ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग, रीअर वायपर, वॉशर आणि डीफॉगर या सर्व सुरक्षा सुविधा स्टेपवेच्या आरएक्सएल या व्हेरिएंटपासून पुढील मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. गाडीला क्रूझ कंट्रोलची सुविधाही आहे. त्यात तुमच्या सोयीनुसार वेग तुम्ही अ‍ॅडजस्ट करू शकता.

jaideep.bhopale@expressindia.com