* मला नॅनो व अल्टो सोडून ऑटोगीअर कारची महिती हवी आहे. जिचे मायलेज किमान १८ किमीचे असेल. मारुती सेलेरिओ बघितली खरी परंतु तिचे मायलेज १२-१३ किमीच असल्याचे कळते. मला हॅचबॅक कार घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करा.

– डॉ. अशोक बुलबुले

*  हायवेवर मला मारुती सेलेरिओचे मायलेज २२-२३ किमी प्रतिलिटर एवढे मिळाले. त्यामुळे सर्वात स्वस्त ऑटोगीअर गाडी हीच आहे. बजेट जास्त असेल तर निसान मायक्रा सीव्हीटी ही गाडी घ्यावी. ती सहा-साडेसहा लाखांत मिळेल.

*  माझ्याकडे सध्या मारुती अल्टो गाडी आहे. माझे रोजचे ड्रायव्हिंग १५ ते २० किमी आहे. मला कुटुंबासोबत लाँग ड्रायव्हिंगला जायला खूप आवडते. म्हणून मला नवीन गाडी घ्यायची आहे. बजेट सहा ते सात लाख रुपये आहे. कोणती गाडी चांगली ठरेल? कृपाय सुचवावे .

– राजेश सवाखंडे

*  तुम्ही केयूव्ही१०० ही गाडी घ्यावी. ही गाडी लांबच्या प्रवासाकरिता खूप चांगली आहे आणि शहरात फिरवायलाही उत्तम आहे. या गाडीचे टॉप मॉडेल तुम्हाला सहा ते सात लाखांत मिळेल.

*  मला रोजच्या वापरासाठी ऑटोमॅटिक गीअरवर चालणारी गाडी घ्यायची आहे. माझा रोजचा प्रवास किमान ३५ किमीचा आहे. माझ्या घरातील सगळेच सदस्य सहा फूट उंचीचे आहेत. त्यामुळे गाडी उंच हवी. बजेट साधारणत: ९ ते १० लाख रुपये आहे.

– मयुरी

’ तुम्ही स्विफ्ट डिझायर झेडडीआय ही ऑटोमॅटिक गाडी घ्यावी. तुम्हाला ही गाडी साडेनऊ लाखांत मिळू शकते. डिझेलवर चालणारी असल्याने या गाडीचे मायलेजही चांगले आहे.

* मी पहिल्यांदाच कार घेणार असून मला ऑटोगीअर गाडय़ा खूप आवडतात. मी तीन कार निवडल्या आहेत. फोर्ड फिगो, ह्य़ुंदाई ग्रँड आय१० आणि सेलेरिओ. यातील फिगो मला खूप आवडते. परंतु ऑटो ट्रान्स्मिशनमध्ये सेलेरिओ जास्त मायलेज देते. माझे रोजचे ड्रायव्हिंग ५० ते ५५ किमी आहे. वरीलपैकी मी कोणती गाडी घ्यावी, असे तुम्हाला वाटते?

श्याम पाटील, पुणे</strong>

*  नवी फोर्ड फिगो तुम्हाला ८.५० लाख रुपयांपर्यंत मिळेल तर सेलेरिओ पाच लाख ६० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. माझ्या मते तुम्ही निसान मायक्रा घ्यावी. हिचे सीव्हीटी ट्रान्स्मिशन आणि १.२ लिटरचे इंजिन खूपच स्मूद आहे आणि मायलेजही उत्तम आहे. हिची किंमत सहा लाखांपर्यंत जाईल.

*  मला कारबाबत जास्त माहिती नाही. परंतु पाच जणांना आरामशीर बसता येईल अशी आणि चालवण्यास सोपी व मायलेज जास्त देणारी आणि मेन्टेनन्स जास्त नसणारी व नवशिक्यांसाठी योग्य असणारी गाडी कोणती? मी हौसेखातर गाडी घेणार आहे. माझे बजेट चार लाख रुपयांपर्यंत आहे. कोणती गाडी घेणे योग्य ठरेल?

– एस. मधुसुदन

*  नवशिक्यांकरिता आणि कमी किमतीत तुम्ही अल्टो ८०० ही कार घ्यावी. परंतु तुम्हाला अधिक स्टायलिश गाडी घ्यायची असेल तर क्विड ही गाडी घ्यावी.