माझा वेफर्स ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. व्यवसाय आणि घरगुती वापर, अशा दुहेरी कारणांसाठी उपयुक्त ठरेल अशी गाडी मला घ्यायची आहे. माझे बजेट चार लाखांपर्यंत आहे. कृपया मला योग्य गाडी सुचवा.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
NCPCR bans sale of Horlicks Boost Bornvita Complan as health drinks
‘आरोग्यदायी’ लेबल लावून विकता येणार नाहीत चवदार पेये?

संजय पाठक

तुम्ही कार्गो घेतली तर ती तुमच्या कुटुंबीयांसाठी उपयुक्त ठरणार नाही. तेव्हा तुम्ही मारुती ईको ही पाच आसनी एसी गाडी घ्यावी. ही बजेट कार असून तिच्यात जागाही भरपूर आहे.

ईऑन एलपीजी व्हेरिएंट घेण्याचा माझा प्लॅन आहे. एलपीजी गाडी घेण्यात काही हरकत नाही ना. तसेच या गाडय़ांमध्ये पुढे नेमक्या काय अडचणी येऊ शकतात, हेही सांगा.

उज्ज्वला पाटील.

ईऑन एलपीजी ही चांगली गाडी आहे, कारण पेट्रोलपेक्षा एलपीजी स्वस्त आहे. परंतु तुम्ही पुण्या-मुंबईत राहात असाल तर सीएनजीला प्राधान्य द्या. तुमचा अधिकाधिक प्रवास बाहेरगावी होत असेल तर एलपीजी योग्य ठरते.

माझे बजेट पाच ते सव्वापाच लाखांचे असून मला सेकंड हॅण्ड गाडी घ्यायची आहे. माझा मासिक प्रवास ५०० किमीचा आहे. स्विफ्ट डिझायर डिझेल गाडी घेणे योग्य ठरेल का.

विजय घाडगे, सोलापूर

तुम्हाला २०११ची स्विफ्ट डिझायर घेणे योग्य ठरेल. साधारण ७०-८० हजार किमी रनिंग झालेले असावे. अशी स्विफ्ट डिझायर तुम्हाला चार-साडेचार लाखांत मिळू शकेल. तुम्हाला हा पर्याय उत्तम ठरेल. परंतु ५०० किमी प्रवासासाठी तुम्ही पेट्रोलवर चालणरी गाडीच घ्यावी.

मी प्रथमच गाडी घेणार आहे. माझा मासिक प्रवास ५०० किमीचा आहे. मला मारुती सेलेरिओ किंवा व्ॉगन आर यापैकी एखादी गाडी घ्यायला आवडेल. कृपया मला तुमचा सल्ला द्या. माझे बजेट पाच लाख रुपये आहे.

मंगेश मोहिते.

तुम्ही सेलेरिओ आणि व्ॉगन आरचे एलएक्सआय हे व्हर्जन घेऊ शकता. परंतु तुम्ही मारुती सुझुकी इग्निस ही गाडी घ्यावी, असा सल्ला मी देईन. कारण या गाडीची किंमत ऑनरोड सव्वापाच लाख रुपये आहे. आणि तिचे इंजिन व तिच्यातील सुरक्षा फीचर्स चांगले आहेत.

माझे मासिक ड्रायव्हिंग सुमारे सात हजार किमीचे आहे. मला अशी एसयूव्ही किंवा कार सुचवा की जिच्यात सेफ्टी फीचर्स चांगले असतील, जिचा मायलेज चांगला असेल आणि मेन्टेनन्सही कमी असेल. माझे बजेट सात ते १२ लाख रुपये आहे.

राहुल पाटील

मी तुम्हाला अर्टिगा डिझेल ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. हिचा मायलेज चांगला आहे. मात्र, तरीही तुम्हाला अधिक आराम आणि जास्त पॉवरबाज गाडी हवी असेल तर रेनॉ लॉजी ही गाडी घेण्याचा सल्ला देईन.