देशातील दुचाकींच्या बाजारपेठेत आणखी एका जपानी कंपनीने स्वतची ओळख निर्माण केली आहे. प्राइस कॉम्पीटेटिव्ह असणाऱ्या या बाजारपेठेत प्रवेश करण्यापासून ते हाय एंड मोटरसायकलचे लाँचिंग असा प्रवास यामाहा मोटरचा झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था खुली नसल्याने ८० च्या दशकात अन्य जपानी कंपन्यांप्रमाणे यामाहाने भारतीय बाजारपेठेत भागीदारीतून प्रवेश केला. एक्सॉर्ट या नंदा परिवाराच्या मालकीच्या कंपनीशी यामाहाचे नाते जुळले. या कंपनीने १९८३ मध्ये राजदूत ही टू स्ट्रोक मोटरसायकल बाजारपेठेत आणली. अर्थात, यासाठी तांत्रिक साहाय्य हे यामाहाचेच मिळाले होते. राजदूत हे भारतीय नाव प्रचलित असले तरी जगाच्या बाजारपेठेत यामाहाची हीच मोटरसायकल आरडी ३५० नावाने ओळखली जात होती. अर्थात, भारतात ही मोटरसायकल उपलब्ध करताना येथील परिस्थिती पाहून आवश्यक ते बदल करण्यात आले होते. मोटरसायकलला साडेतीनशे सीसीचे इंजिन होते. त्यामुळे महागडी, कमी मायलेज देणारी ही मोटरसायकल असल्याने संक्रमणावस्थेतून जात असलेल्या भारताच्या बाजारपेठेने या मोटरसायकला स्वीकारले नाही. याच काळात अन्य कंपन्यांनी लाँच केलेल्या कमी सीसी व आकर्षक किमतीच्या मोटरसायकलना मागणी होती. त्यामुळेच कंपनीने शंभर सीसीच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Marathi newspaper is not available in Tejas Express
मुंबई : तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठीचे वावडे
Samsung launched Galaxy Fit3 fitness tracker in India claimed battery life thirteen days With Reasonable Price
स्वस्त स्मार्टवॉच कंपन्यांना सॅमसंगची टक्कर! गॅलॅक्‍सीचा नवीन फिटनेस ट्रॅकर लाँच; पाहा जबरदस्त फीचर्स
Tata Airlines Air India unique offer
टाटा एअरलाइन्सची अनोखी ऑफर; चेक इन बॅगेजशिवाय प्रवास केल्यास मिळणार जबरदस्त सवलत
purv flexipack to raise rs 40 crore via ipo on nse
प्लास्टिक्स उत्पादनातील ‘पूर्व फ्लेक्सीकॅप’ची येत्या आठवड्यात ४० कोटींची प्रारंभिक समभाग विक्री 

कंपनीने आर एक्स १०० मोटरसायकल बाजारात आणली. मोटरसायकलचा पिकअप चांगला होता आणि फायिरगही धमाकेदार होते. तसेच, मोटरसायकलमध्ये क्रोमचा वापर योग्यपद्धतीने करण्यात आली होती. त्यामुळे ही मोटरसायकल एक स्टाइल स्टेटमेंट झाली. आर १०० चे फायिरग व पिअकप हेच या मोटरसायकल खरेदी करण्यामागचे प्रमुख कारण होते. ही मोटरसायकल किती मायलेज देते हा विचार करणारा ग्राहक या मोटरसायकल दूर राहिला होता. मात्र, अशी मोटरसयाकल आपण घ्यावी, अशी इच्छा होती. तसेच, अन्य शंभर सीसी मोटरसायकलप्रमाणे आर १०० चे उत्पादन भारतात होत नव्हेत. ही मोटरसायकल लाँच झाल्यापासून अनेक वर्ष जपानमध्ये तयार होऊन भारतात केवळ जुळणी करून विकली जात होती. त्यामुळे मोटरसायकलवर मेड इन जपान असेही लिहिलेले होते आणि जपानी वस्तू या दणकट, टिकाऊ, उच्च गुणवत्तेच्या असे द्योतक होते आणि आजही आहे. अनेक वर्षे आरएक्स १०० ही यामाहाची ओळख होती.

पुढे जाऊन एक्सॉर्ट यामाहा यांची भागीदारी संपुष्टात आली. पण, यामाहाने आरएक्स १०० मोटरसायकलेच उत्पादन सुरू ठेवले. जागतिक पातळीवर पर्यावरणाचे निकष बदल होते, तसेच भारतानेही त्याचा अवलंब करण्यास सुरुवात कली होती. त्यामुळेच १९९९-२००० आसपास देशात टू स्ट्रोक वाहनांची विक्री होणार नाही, असा निर्णय झाला. त्यामुळे यामाहाने आरएक्स १०० चे टू स्ट्रोक व्हर्जन बंद केले. याचा फटकाही कंपनीला बसला. कारण कंपनीने बाजारात आणलेल्या आरएक्स १३५ व आरएक्झझेडला प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक मोटरसायकल सादर केल्या यामद्य्ो १०० सीसी, १२५ सीसी, १५० सीसीच्या मोटरसयाकल तसेच एक क्रूझर मोटरसायकलाचाही समावेश होता. मात्र, या मोटरसायकलना व्यावसायिक यश  मिळाले नाही. त्यामागे डिझाइन, मोटरसायकमधील तांत्रिक दोष, विक्री-पश्चात सेवा असे घटक कारणीभूत होते. बायबीआर १००-१२५, लिबेरो, ग्लॅडिएटर, फेजर, एंटायसर, वायझेडएफ आर२५, वायझेडएफ आर३, अल्बा आदी मोटरसायकल कंपनीने भारतात लाँच केल्या. मात्र, यापकी कोणतीच मोटरसयाकल ग्राहकांच्या मनात घर करून गेली नाही.

आजही यामाहा १०० चे उत्पादन बंद होऊन दशकभराहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरीही यामाहीची आरएक्स १०० म्हटलं की मोटरसायकल प्रेमींना लगेचच या मोटरसायकलचे फायिरग, पिकअप डोळ्यापुढे येतो. तसेच, ज्यांनी ही मोटरसायकल चालविली ते आजही या मोटरसायकलच्या पिकअपचे दाखले देताना दिसू शकतात. याच वैशिष्टय़ामुळे विक्रीबंद होऊनही काही लोकांनी ही मोटरसायकल जपून ठेवली आहे. तसेच, यूजड् मोटरसायकलच्या बाजारपेठेत यामाहा आर १०० हवी आहे, असे म्हणणारे लोकही आहेत. जुनी घेऊन त्यावर खर्च करून अनेकांनी तिला नवा साज चढविण्याचा प्रयत्न केला आहे. यामाहाच्या आर १०० ने मोटरसायकलप्रेमींच्या मनावर नक्कीच राज्य केले. तसेच, यातूनही कंपनी बरेच काही शिकली आणि भारताच्या प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटमध्ये स्वतची ओळख निर्माण करू लागली आहे. (पूर्वार्ध)

obhide@gmail.com