(दु:खीकष्टी आणि डोळ्यांत अश्रू दाटलेला चंपक तॅत्सकडे येतो)
तॅत्स : चंपकराव, हा खेळ आहे. हारजीत होणारच. लढत देणं महत्त्वाचं, ती दिलेय टीम इंडियानं.
wc04चंपक : सांत्वनाचा शब्दच्छल करू नका. हरलो ही फॅक्ट आहे आणि ती वेदनादायी आहे.
तॅत्स : तुमच्यासारख्या कट्टर चाहत्याला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. हा चहा घ्या. स्पेशल अदरकवाला आहे.
(चंपक कटिंगचा ग्लास हातात घेतो)
चंपक : आपली एकेक विकेट पडत असताना तुमचे शब्द आठवत होते. त्यांचं बेसिक घोटीव आहे, ते भावनांपेक्षा व्यावसायिकतेला महत्त्व देतात.
तॅत्स : उगाच का एवढय़ा वेळा विश्वचषक उंचावला आहे. स्टिव्हन स्मिथ बाद झाल्यावर त्यांचीही घसरगुंडी उडाली होती. पण ते कुठूनही कमबॅक करतात. आपला अजिंक्य बाद झाला त्या वेळी मागितलेलं अपील असो किंवा मॅक्सवेलने धोनीला केलेला रनआऊट असो- इंग्रजीत क्लिनिकल म्हणतात तसे आहेत ते.
चंपक : एक मॅच दूर होतो कपपासून.
तॅत्स : रणगाडा कसा उलथवत जातो चाकाखालचं तसे आहेत ऑस्ट्रेलियन्स. ४५००० प्रेक्षकांपैकी ३०,००० आपले चाहते होते. निळाई वगैरे लोक म्हणत होते. काही फरक पडला त्यांना. त्यांना बस्स जिंकायचंय..
(चंपक चहा संपवतो, आणि न बोलता वळतो घरी जायला)
तॅत्स : अहो चंपकशेठ. असे जाऊ नका.
चंपक : आमच्यासाठी विश्वचंपक संपला आज..