भारत केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकेल असे नव्हे तर अंतिम फेरीत पोहोचून जगज्जेता होणार, हा सट्टेबाजांचा अंदाज पार फसला. मात्र त्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले असेही नाही. याचे कारण म्हणजे logo07त्यांनी दोन्ही संघांना समान भाव दिले होते. त्यातही ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कल दाखविला होताच. मात्र या एका सामन्याच्या भवितव्यावर भारत थेट अंतिम फेरीत पोहोचून विश्वविजेता होईल, असा सट्टेबाजांचा होरा मात्र चुकला आहे. सट्टा हा शेवटी काय, जुगारच. डाव फसल्याचे त्यांना कधीच दु:ख नसते. परंतु डाव लागला असता तर मात्र त्यांची चांदी होते. आता पुन्हा रविवारच्या अंतिम सामन्यासाठी सट्टेबाज सज्ज. आता मात्र ते पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनेच कौल देत आहेत. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थरारक विजय मिळविला असला वा ऑस्ट्रेलियाला बाद फेरीत हरविले असले तरी सट्टेबाजांनी ऑस्ट्रेलियालाच पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियासाठी ५५ पैसे असा भाव देणाऱ्या सट्टेबाजांनी न्यूझीलंडसाठी पावणेदोन रुपये देऊ केले आहेत. याचा अर्थ हा सामना आणि विश्वविजेतेपद ऑस्ट्रेलिया सहज खिशात टाकेल, असा त्यांचा होरा आहे. मात्र असे भाव देण्यामागे सट्टाबाजारातील उलाढाल वाढविण्याचाही त्यांचा हेतू असतो. कारण जुगार खेळण्यासाठी अनेक जण सज्ज असतात. अनेकांना न्यूझीलंड जिंकेल असे वाटते आणि न्यूझीलंड विजयी झाल्यास तेवढी किंमत मोजण्याची सट्टेबाजांची तयारी असते, परंतु निकाल विरुद्ध आला तर तो सट्टेबाजांना हवा आहेच.
सामन्याचा भाव
ऑस्ट्रेलिया : न्यूझीलंड :
५५ पैसे; पावणेदोन रुपये
निषाद अंधेरीवाला