दावेदार अनेक असले तरी मैदानावर त्या दिवशी जो सरस ठरतो तोच खरा ‘मुकद्दर का सिकंदर’ याच उक्तीने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान संपुष्टात आणून अंतिम फेरी गाठली. याआधी चार विश्वचषक जिंकलेला ऑस्ट्रेलियन संघ मायभूमीत विश्वविजेतेपदाची पंचमी साजरी करण्यासाठी सज्ज आहे. तर, यंदाच्या स्पर्धेत आठही सामने जिंकून आपल्या पहिल्या-वहिल्या विश्वविजयाच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले ‘किवी’ आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीने मैदानात उतरतील.
आजवर एकही विश्वविजेतेपद न्यूझीलंडकडे नसल्याने त्यांनीच जिंकावे अशी भावनिक आशा क्रिकेटचाहत्यांची आहे. पण, ऑस्ट्रेलियाने देखील आपल्या भात्यात सर्वगुण संपन्न खेळाडू असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे भावनांपेक्षा गुणवत्ता वरचढ ठरेल आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वविजयी होण्याची शक्यता आहे.
[poll id=’896′]