पराभवाच्या चक्रव्ह्य़ूहात अडकलेल्या पाकिस्तानला आतापर्यंत विश्वचषकात एकही सामना जिंकता आलेला नसून झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्यांना पहिल्या विजयाची आस असेल. झिम्बाब्वेने आतापर्यंत दमदार कामगिरी केली असून ते पाकिस्तानला धक्का देतात का, हे पाहणे या सामन्यात उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाकिस्तानला कोणत्याही आघाडीवर अजूनही सूर सापडलेला नाही. फलंदाजीमध्ये कर्णधार मिसबाह उल हक वगळता एकाही फलंदाजाला चांगल्या धावा करता आलेल्या नाहीत. युनिस खान आणि शाहिद आफ्रिदी यांच्याकडे चांगला अनुभव असला तरी त्यांच्याकडून चांगली कामगिरी झालेली नाही. गोलंदाजीमध्ये मोहम्मद इरफान आणि वहाब रियाझकडून मोठय़ा अपेक्षा असतील.
झिम्बाब्वेच्या संघाची उत्तम बांधणी प्रशिक्षक डेव्ह व्हॅटमोर यांनी केली असून कोणत्याही संघावर ते भारी पडू शकतात. संघामध्ये कर्णधार एल्टन चिगुंबुरा, शॉन विल्यम्स, ब्रेंडन टेलर, हॅमिल्टन मसाकाझासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव असलेले खेळाडू आहेत.
या खेळाडूंनी परिस्थितीनुरूप लौकिकाला साजेशी कामगिरी केल्यास त्यांना पाकिस्तानला धक्का देता येऊ शकतो.
सामना क्र. :  २३   पाकिस्तान वि. झिम्बाब्वे
स्थळ : ब्रिस्बेन  
वेळ : सकाळी ९.०० वा.पासून
आमने सामने
सामने : ५ ’  पाकिस्तान-४  ’ झिम्बाब्वे-० ’ अन्य-१
संघ
पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहझाद, मोहम्मद हाफीझ, सर्फराझ अहमद, युनिस खान, हरिस सोहेल, उमर अकमल, शोएब मकसूद, शाहीद आफ्रिदी, यासिर शाह, मोहम्मद इरफान, जुनैद खान, एहसान अदिल, सोहेल खान, वहाब रियाझ.
झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), सिकंदर रझा, रेगिस चकाबव्हा, तेंडाई चटारा, चामू चिभाभा, क्रेग इरव्हिन, तफाड्झ्वा कामुनगोई, हॅमिल्टन मसाकाझा, स्टुअर्ट मॅत्सिकेनयेरी, सोलोमन मिरे, तवांडा मुपारिवा, तिनाशे पानयांगरा, ब्रेंडन टेलर (यष्टीरक्षक), प्रॉस्पर उत्सेया, शॉन विल्यम्स.
थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर