कामाचे पाच-सहा दिवस कधी संपतात आणि सुटीचा शनिवार-रविवार कधी एकदाचा येतो, याची आपण सर्व नोकरदार मंडळी नेहमीच चातकासारखी वाट पाहात असतो. ऑस्ट्रेलियात ‘वीकेंड’साठीची उत्सुकता भलतीच wc08कमालीची असते. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या असलेल्या या वीकेंडची चर्चा सोमवारपासूनच सुरू होते. हे ‘गॉसिप’ सोमवार-मंगळवारी कॅन्टीन, कॅफे, ट्रेन किंवा बसमध्येदेखील ऐकू येते. ‘हम्प डे’ला (बुधवार किंवा आठवडय़ाच्या मधला दिवस) याचा जोर थोडा कमी होतो. पण गुरुवार आणि शुक्रवारी परत येत्या आठवडय़ाच्या योजनांच्या गप्पा परत जोर पकडतात आणि बघता बघता शनिवार उजाडतो.
शुक्रवारी एका ऑसी मित्राला त्याच्या वीकेंडबाबत विचारले, तर तो म्हणाला, ‘‘निथग मच, फायर ए बार्बी, िड्रक सम बियर, वॉच ऑसीज क्रश द किवीज अँड इंडिया बीट यूएई.’’ ऑस्ट्रेलियात उन्हाळ्यात पडणाऱ्या खुसखुशीत उन्हाचे स्वागत ऑसी परिवारासह समुद्रकिनाऱ्यावर अथवा पाण्याजवळ मासे पकडत आपला वेळ खर्च करून करतात. संध्याकाळी घरून तयार करून आणलेल्या किंवा पकडलेल्या ताज्या माशाच्या बाब्रेक्यू (आपल्या घराबाहेरील अंगणात, बाल्कनीत किंवा बाहेर पार्कमध्ये गॅस, कोळसा किंवा विजेचा वापर करून लोखंडी हॉट प्लेटवर तयार केलेले जेवण) सोबत बियरचा आनंद लुटतात. ‘फॉस्टर’ हा ऑस्ट्रेलियन बियरचा चेहरा म्हणून भारतात अजूनही ओळखला जातो, पण गमतीची गोष्ट अशी की ऑस्ट्रेलियामध्ये याचे सेवन कुणीही करत नाही, इतकेच काय तर इथल्या स्थानिक लोकांनादेखील ‘फॉस्टर’बद्दल ठाऊक नाही आणि हा शोधूनही सापडत नाही. बहुदा हा एक ‘एक्स्पोर्ट ओन्ली टू इंडिया’ असावा.  
या ऑसी मित्राला मी उत्तर दिले, ‘‘सेम मायनस द बाब्रेक्यू!’’ यावर तो मला म्हणाला, ‘‘डोन्ट अंडरएस्टिमेट यूएई!’’
मी काही प्रतिक्रिया न देत म्हटलं, ‘‘एन्जॉय!’’ आणि घरी निघालो. भारतविरुद्ध यूएईचा सामना ‘फ्री टू एयर’वर प्रदíशत होत नसल्याने मी काही ‘देशी’ मित्रांना केबलवर या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी घरी आमंत्रित केले होते.
शहरात वातावरण अत्यंत शांत होते. सहसा पबमध्ये सामना बघण्यासाठी साधारणपणे गर्दी जमते, पण शनिवारी कुठेही गर्दी दिसली नाही. जणू ऑस्ट्रेलियन क्रिकेट समर्थकांना आपल्या संघाच्या विजयाची संपूर्ण खात्री होती. दुपारी पहिला सामना होता तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये. तो सामना सुरू झाला होता आणि मित्रांना यायला थोडा उशीर होणार होता. छोटे मदान आणि विध्वंसक फलंदाज यांच्या मिश्रणाने विश्वचषक इतिहासात नवीन पाने जोडली जातील अशी अनेकांना अपेक्षा होती. सामना इतका रंगला की मित्रांनी ऑनलाइन बघण्यासोबत कॉमेंट्री ऐकायला सुरुवात केली. सामना प्रत्येक षटकात थरारक रूप घेत होता. फलंदाजांऐवजी गोलंदाजांनी खेळपट्टीवर आपली सत्ता गाजवली होती. कुणी सामना संपल्याशिवाय घर सोडायला तयारच होई ना. सामन्याचा निकाल न्यूझीलंडसाठी अनुकूल लागला आणि काही मित्रांनी, ‘थोडय़ा वेळात निघतो’ असे कळवले. भारताचा सामना सुरू झाला आणि लवकरच यूएईची अवस्था दयनीय झाली. बघता बघता भारताने १०२ धावांत यूएईला गुंडाळले. आता सामन्यात बघण्यासारखे काही उरले नव्हते आणि लगेचच मित्रांचे ‘येणे व्यर्थ’ असे एसएमएस यायला लागले. भारताने फार घाम न गाळता यूएईची शिकार केली. मित्रांबरोबर सामने बघण्याची माझी योजना धुळीत मिळाली होती.
विजयामुळे भारतीयांची कॉलर नक्कीच वर झाली आहे, पण अजूनही आपण असे प्रदर्शन कुठवर करू शकू, याची भीती इथल्या समर्थकांना नक्कीच लागून राहिलेली दिसत आहे. रविवारी ऑस्ट्रेलियात शुकशुकाट जाणवत होता. गेल्या तीन महिन्यांत लागलेली जिंकायची सवय न्यूझीलंडने मोडली होती. पराभव पचवणे हे ऑस्ट्रेलियाला फार काळ जमले नाही. खास करून मावस भावाकडून मिळालेल्या या पराभवाची याच विश्वचषक स्पध्रेत परतफेड कशी करावी, ही योजना रचायला ऑसी खेळाडूंनी नक्कीच सुरुवात केली असेल. आता सोमवारी ऑसी मित्राला गाठून विचारलेच पाहिजे, ‘‘हाऊ वॉज
युवर वीकेंड?’’