popat(फुटपाथवर पसरलेल्या चिखलातून वाट काढत विंचहीटर आणि पावसाळी सॅण्डल्स अशा पेहरावात चंपक तोतारामच्या इण्डोअर पसाऱ्यात दाखल होतो.)
चंपक : रीतसर पावसाळा वाटतोय यार. महापकाऊ वातावरण. सकाळी एवढी भारी मॅच झाली आणि नंतर हा वैताग.
तोताराम : चंपकशेठ चालायचंच. भरपूर पावसाळे पाहिलेत की मगच तयार व्हाल.
चंपक : तयार होऊन कुठे आणि कोणाला दाखवायचंय.. मॅच मात्र तुम्ही म्हणालात तशी स्पाइसी झाली.
तोताराम : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड म्हटल्यावर मॅच स्पाइसी हे बाय डिफॉल्ट.
चंपक : झिम्बाब्वे दणका देणार काय पाकिस्तानला?
(विठ्ठलपंत हिरव्या रंगाचे कार्ड हाती देतात)
तोताराम : दणका संभवत नाही. सामने गमावणं त्यांच्या अंगवळणी पडलंय. मायदेशी लोक पुतळे जाळत आहेत, निवड समितीचे अध्यक्ष कॅसिनोत आहेत. हे सगळं असलं ना तरी पाकिस्तान जिंकेल झिम्बाब्वेविरुद्ध. आता ते गाशा गुंडाळून घरी जाणार असे वाटत असतानाच त्यांची ‘कमबॅक मेथड’ लागू होते. कसं आहे पैसा मूळ आहे सगळ्याचं. तेच मिळाले नाही की माणसं अस्वस्थ राहतात सगळ्या पातळ्यांवर. लोकांना कठीण वाटतं ते पाकिस्तानला सोपं असतं. युनिस खान अनुभव सिद्ध करेल. ब्रेंडन टेलरला संधी आहे मोठं होण्याची. मॅच मस्त होईल!
चंपक : ओकीज.