04 December 2020

News Flash

जाणून घ्या : मुंबईनंतर प्ले ऑफमध्ये कोणता संघ कशापद्धतीने होऊ शकतो क्वालिफाय

चेन्नईनं समिकरणं बदलली, तीन जागासाठी सहा संघात चुरस...

आयपीएलचा १३ वा हंगाम उत्तरार्धाकडे झुकला आहे. प्ले ऑफच्या सामन्यापूर्वी आता फक्त सात सामने बाकी आहेत. मुंबईचा संघ क्वालिफाय होणारा पहिला संघ आहे. मुंबईशिवाय अंतिम चारमध्ये पोहचण्यासाठी सहा संघामध्ये चुरस सुरु आहे. तीन जागांसाठी सहा संघामध्ये होणारी चुरस रंगतदार होणार आहे. सीएसके वगळता सर्व संघाना क्वालिफाय होण्याची संधी आहे. काही संघाना नेट रन रेट खराब असल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स वगळता इतर सहा संघ प्ले ऑफमध्ये कशापद्धतीने क्वालिफाय होऊ शकतात….

१) चेन्नईविरोधातील पराभवामुळे कोलकाता संघाला प्ले ऑफमध्ये पोहचण्याची फक्त ५.५ टक्के (नेट रन रेटशिवाय) संधी आहे.

२) कोलकाता संघाला चौथ्या स्थानावर पोहचण्याचे २५ टक्के संधी आहे. पण कोलकाता संघाचा नेट रन रेट कमी असल्यामुळे तशी संधी कमीच दिसतेय.

3) विजयामुळे चेन्नई आता तळाशी राहणार नाही.

४) कोलकाता संघाच्या पराभवाचा फायदा पंजाब संघाला झाला आहे. पंजाब संघाचे क्वालिफाय होण्याची संधी आता ९ टक्के (नेट रेन रेटशिवाय) झाली आहे. याआधीही त्यांची क्वालिफाय होण्याची संधी फक्त सहा टक्के होती.

५) अंतिम चारमध्ये पोहचण्याची मोठी संधी कोलकाताला आहे.

६) कोलकाताच्या पराभवामुळे हैदराबादचीही अंतिम चारमध्ये पोहचण्याची संधी वाढली आहे. सर्व सामने जिंकल्यास हैदराबाद तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर कब्जा मिळवू शकतो.

७) राजस्थान संघाला चौथ्या स्थानावर पोहचण्याचे संधी ५.५ टक्के इथकी आहे.

८) मुंबईचा संघ पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर आपलं निर्वादित वर्चस्व राखू शकेल. त्याखाली येण्याची शक्यता नाहीच.

९) दिल्ली आणि आरसीबी अंतिम चारमध्ये आपलं स्थान पक्क करण्याची शक्यता आहे. दोघांचेही गुण समान होण्याचीही संधी आहे. पण नेट रन रेटच्या आधारावर गुणतालिकेत क्रमांक ठरविला जाईल.

१०) साखळीफेरीअखेर चार संघ १६ गुणांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. मुंबई, दिल्ली, आरसीबी आणि पंजाब या संघाना १६ गुणांपर्यंत मजल मारता येईल

११) हे होण्यासाठी पंजाबला उर्वरीत सर्व सामने जिंकणे गरजेचं आहे. दिल्लीला उर्वरीत दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय आवशक आहे. यामध्ये मुंबईच पराभव करावा लागेल. तसेच आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागेल. तसेच मुंबई आणि आरसीबीला हैदराबादकडून पराभव स्वीकारावा लागेल.

आयपीएलच्या १३ व्या हंगामात अनेक रंगतदार सामने पाहायला मिळाले. पंजाबने लागोपाठ पाच सामन्यात विजय मिळवत आपलं आवाहन जिंवत ठेवलं आहे. तर कोलकाताला सीएसकेचा पराभव चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. मुंबईनं प्लेऑफचं तिकिट पक्कं केलं आहे. तर आरसीबी आणि दिल्लीला यांच्याशिवाय पंजाब, कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात प्लेऑफसाठी सामने होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 1:35 pm

Web Title: ipl 2020 all playoff possibilities in 11 points nck 90
टॅग IPL 2020
Next Stories
1 पराभवनानंतर KKR ची वाट बिकट; तरीही असे होऊ शकतील क्वालिफाय
2 धोनीला ऋतूराजच्या रुपात तरुण खेळाडूमध्ये सापडला स्पार्क, म्हणाला…
3 Video : चक्रवर्तीच्या जाळ्यात अकडला धोनी, दुसऱ्यांदा केली दांडी गुल
Just Now!
X