प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि कॉमेडियन समय रैना सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करत आहेत. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला वादग्रस्त प्रश्न विचारल्याने नेटकरी भडकले आहेत. लेखक नीलेश मिश्रा यांनीही रणवीरवर टीका करत ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. मिश्रा यांनी रणवीरच्या प्रश्नांना विकृत आणि जबाबदारीशून्य म्हटले आहे, ज्यामुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.