भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी “लाडकी बहीण योजना” संदर्भात दिलेल्या आश्वासनावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण केलं जाईल. योजनेची वाढीव रक्कम कधीपासून दिली जाईल हे मंत्रिमंडळात ठरवलं जाईल. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वचन पाळण्याची विनंती केली आहे.