01 October 2020

News Flash

हाथरसमधली घटना पाशवी! महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?- राज ठाकरे

हाथरसमधली घटना पाशवी! महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?- राज ठाकरे

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडना घडल्यानंतर सध्या देशभरात सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेला काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला धारेवर धरत आहेत. पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला असून, ही घटना पाशवी असल्याचं म्हटलं आहे. याचसोबत महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांनाही जाब विचारला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 आपुली आपण करी स्तुती.

आपुली आपण करी स्तुती.

‘‘अरे गृहस्था जरा गप्प बस,’’ असे ट्रम्प यांना सुनावण्याची वेळ बायडेन यांच्यावर आली. मग या चर्चेचे फलित काय?

लेख

अन्य

Just Now!
X