News Flash

महापुरानंतर महागाई

महापुरानंतर महागाई

करोना टाळेबंदीमुळे अडचणीत आलेला कुक्कुटपालन व्यवसाय, कोंबडीचे खाद्य महागल्याने उत्पादन खर्चात आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यांच्या एकत्रित परिणामामुळे चिकनचे दर भडकले आहेत, तर कोल्हापूरला बसलेल्या महापुराच्या तडाख्यामुळे दूधपुरवठा विस्कळीत होऊन दरवाढ झाली आहे. अतिवृष्टीचा फटका बसल्याने भाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे.मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आदी शहरांमध्ये चिकनच्या दरात २० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. अंडय़ांच्या दरातही वृद्धी झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी तसेच महापुरामुळे भाजीमळ्यांची नासाडी झाली आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठय़ावर झाला असून आवक मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. आवक घटल्याने त्यांचे भाव वधारण्याची भीती आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 शेवटचा स्वयंभू!

शेवटचा स्वयंभू!

भाजपचा हा शेवटचा स्वयंभू नेता. त्यास असे घालवावे लागणे राजकारण पातळी निदर्शक ठरते.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X