लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: भिवंडी येथील रांजनोली नाका भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. प्रसाद चौवले (२६) आणि किरण कोंडा (२७) अशी अटकेत असलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ४१ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

रांजनोली नाका येथील पूलाखाली दोन जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी दोघेजण एका कारमधून येत होते.

हेही वाचा… डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा

पोलिसांनी ही कार अडविली. त्या कारमध्ये ४१ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कारमधील प्रसाद आणि किरण या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.