News Flash

पेट्रोल-डिझेलचा ‘जीएसटी’मध्ये समावेश करण्याचा निर्णय लांबणीवर; कारण...

nirmala-sitaraman1

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली ४५ वी मॅरेथॉन जीएसटी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकार आणि राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी माध्यमांना बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. या बैठकीतही पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे पेट्रोल,डिझेल स्वस्त होईल ही सामान्य नागरिकांची आशा मावळली आहे. दुसरीकडे, करोना व्यतिरिक्त महाग जीवनरक्षक औषधं आहेत त्यांना सूट देण्यात आली आहे. त्या औषधांवर जीएसटी नसेल असं, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे. करोना रुग्णांच्या उपचारासाठी मोफत आयात केली जाणारी श्वसनयंत्रे, प्राणवायू विलगीकरण यंत्रांसारखी साह्यभूत सामग्री तसेच, म्युकरमायकोसिसवरील ‘अ‍ॅम्फोटेरीसिन-बी’ची कुपीही वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

  • अवश्य वाचा

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
लिक्विड ऑक्सिजन!

लिक्विड ऑक्सिजन!

‘दूरसंचार क्षेत्रास संजीवनी’ मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उपायांचे स्वागत.

लेख
अन्य
टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X